Thursday, April 18, 2024
घरमानिनीRelationshipपालकांनी मुलांबरोबर कुठल्या गोष्टींवर चर्चा करायला हवी

पालकांनी मुलांबरोबर कुठल्या गोष्टींवर चर्चा करायला हवी

Subscribe

21वी शतकात अनेक भारतीय घरांमध्ये सेक्स एज्युकेशनवर (sex education) दबक्या आवाजात चर्चा केल्या जातात. यात सेक्स एज्युकेशनवर चर्चा करणे हे काही पाप नाही. कारण, भारतामध्ये जास्त करून वयात आलेल्या मुला-मुलींना सेक्स एज्युकेशनबद्दल पुरेशा माहिती अभाव असल्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने माहिती मिळवितात. ही माहिती टीनएजर्ससाठी धोकादायक असून शकते. टीनएजर्सला (Teenagers) सेक्स एजुकेशनबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. आज आपण या मुद्द्यावर चर्चा करून तुमच्या मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे.

तुम्ही टीनएजर्ससोबत इकड-तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा सेक्स एज्युकेशनबद्दल थेट संवाद साधा. तुम्ही मुलांना काही उदाहरण देऊन शकता की ते स्वत: त्याला रिलेट करू शकता. थोडे विचित्र वाटेल, पण इकडच्या तिकडच्या मुद्द्यांवर बोलून विषयावर येण्यापेक्षा थेट टीनएजर्सशी संवाद साधणे योग्य ठरेल. तुम्ही त्यांना काही उदाहरणे देऊ शकता जेणेकरून ते गोष्टी स्वतःशी संबंधित करू शकतील. टीनएजर्स मुलांशी थेट बोलणे देखील आवश्यक आहे कारण, ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात काजून टप्प्यात असतात. त्यांच्या शरीरात होणारे बदल आणि त्यांच्या मनातील चलबिचल जाणून घेण्याची इच्छा असेत आणि हे समजून घेण्यासाठी ते त्याच्या मित्रांपासून इंटरनेटपर्यंत सर्वत्र माहिती शोधत असतात. यामुळे मुलांना सेक्स एज्युकेशन देणे गरजेचे आहे. हे काम फक्त पालकच करू शकतात.

- Advertisement -

मुलांना हे माहीत असले पाहिजे की, सेक्स एज्युकेशन संबंध ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु, त्यासाठी योग्य वय लागते. कदाचित मुलांचे प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकतील. पण, तुम्हाला संकोच किंवा गोंधळ न करता त्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतील. त्यांच्या वयानुसार माहिती द्यावी लागेल.

- Advertisement -

मुलांना मर्यादेबद्दल सांगा

मुलांना सेक्स एज्युकेशन दिणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांना यांच्या मर्यादा देखील सांगणे गरजेचे आहे. जेव्हा व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असाल तेव्हाच सेक्स करू शकतात. हे कोणत्याही प्रलोभन किंवा दबावाखाली हे करू नका. कंफर्म आणि संमती असणे खूप महत्वाचे आहे. टीनएजर्स मुलांना सेक्स एज्युकेशन संबंधित योग्य आणि चुकीच्या पैलूंबद्दल माहिती देणे खूप महत्वाचे आहे.

सेक्स एज्युकेशनवर चर्चा करा

आपण अशा समाजात राहतो जिथे विषमलैंगिकता सामान्य मानली जाते. पण आपल्या सोसायटीत LGBTQIA समाजाचे लोकही राहतात ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला तुमच्या मुलांना समजावून सांगावे लागेल की, त्यांच्यातही असे लैंगिक प्रवृत्तीचे लोक दिसतील. त्यांच्याबद्दल वाईट वागू नका. LGBTQIA समुदायामध्ये असण्यात काहीच गैर नाही. अशा रीतीने मुलांच्या मनातून लिंग संबंधी कोणत्याही प्रकारची दुर्बुद्धी दूर होते. ते चांगले नागरिक बनवावे.

मासिक पाळीबद्दल योग्य माहिती द्यावी

मासिक पाळी याविषयी कुटुंबात सहसा बोलले जात नाही. मुलींना हे गुपचूप सांगितले जाते, पण, मुलांशी याबद्दल बोलणे योग्य मानले जात नाही. ही परंपरा तुम्ही तुमच्या घरात मोडली पाहिजे. सहसा जीवशास्त्राच्या वर्गात याबद्दल बोलले जाते, परंतु वर्गाबाहेर यावर योग्यरित्या चर्चा केली जात नाही. जेव्हा तुम्ही घरी याबद्दल सोयीस्कर असाल आणि मुलाला योग्य माहिती द्याल, तेव्हा त्यांना समजेल की ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यात काहीही चूक किंवा लपवण्यासारखे काही नाही. जर तुम्हाला मुलगी असेल, तर ती मासिक पाळीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व साधणे हे तिच्या सोयीनुसार साधणे निवडू शकते. दुसरीकडे, जर तुम्हाला मुलगा असेल तर त्याला मुलींची ही मासिक प्रक्रिया समजेल. तो कधीच पीरियड्सबद्दल मुलींना कमेंट किंवा चिडवल्यासारखे वागणार नाही.


हेही वाचा – पीरियड्सच्या गोळ्यांनी होतात side effects

- Advertisment -

Manini