Sunday, February 25, 2024
घरमानिनीRelationshipलव्ह मॅरेज का टिकत नाहीत?

लव्ह मॅरेज का टिकत नाहीत?

Subscribe

लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा आहे. जो केवळ दोन लोकांनाच जवळ आणत नाहीतर तर दोन कुटुंबाना धार्मिक दृष्ट्या एकत्रित बांधतो यात शंका नाही. पण हल्ली अरेंज मॅरिजच्या तुलनेत लव्ह मॅरेजला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. अशी बरीच तरुण मंडळी आपण आजूबाजूला पाहिली असतील की, जी लग्नाच्या तयारीत असतील.

लग्न करणे सोप्पे आहे पण हे नाते आयुष्यभर निभावणे तसे कठीण आहे. हल्ली आपण बरेच असे कपल्स पाहतो ज्यांचे लव्ह मॅरिज असूनही नाते फार काळ टिकत नाही. आज आपण अशी कारणे पाहणार आहोत, ज्याने लव्ह मॅरेज करूनही नाते टिकवणे कठीण होऊन बसते.

- Advertisement -

घाईत निर्णय घेणे –
लव्ह मॅरिज तुटण्याचे मुख्य कारण म्हणजे घाईत निर्णय घेणे. काही कपल्समध्ये केवळ ६ महिन्यांची ओळख असूनही लग्न करण्याचा निर्णय घेण्यात येतो. हळूहळू पार्टनरमधील दोष दिसू लागतात आणि नाते तुटण्याच्या मार्गावर येते.

आदर न करणे –
जर नात्यात आदर नसेल तर लव्ह मॅरिज असो की, अरेंज मॅरिज नाते टिकण्याची शक्यता फार कमी असते. कोणतेही नाते हे आदरावर उभे असते. जेव्हा तुम्ही एकमेकांची कदर करता तेव्हाच हे नाते टिकू शकते. जर तुम्ही तुमच्या नात्यात एकमेकांचा आदर राखला नाही तर तुमचे नाते फार काळ टिकत नाही. लव्ह मॅरिजमध्ये लग्नाआधी पार्टनरसोबत आपण एकदम मनमोकळेपणाने वागत असतो. पण, लग्नानंतर ही परिस्थिती बदलते.

- Advertisement -

एकमेकांना वेळ कमी देणे –
लग्नाआधी कपल्स एकेमकांना भरपूर वेळ देतात. भेटून विविध गोष्टींवर चर्चा करतात. पण, लग्नानंतर गोष्टी बदलतात हे अनेकांना काळात नाही. काही जण हा बदल पटकन आत्मसात करतात तर काही करत नाही. याचा परिणाम नात्यावर व्हायला सुरुवात होते.

कौटुंबिक मतभेद –
आपल्या समाजात आजही लव्ह मॅरिजला हवी तशी पटकन मान्यता मिळत नाही. एकच छताखाली राहून लोक एकमेकांचा स्वीकार करीत नाही. हे सुद्धा अनेकदा लव्ह मॅरिज न टिकण्याचे कारण बनते.

 

 


हेही वाचा : कपल पॉज म्हणजे काय? नक्की काय आहेत याचे परिणाम

- Advertisment -

Manini