Sunday, February 25, 2024
घरमानिनीRelationship'प्रेमाचे प्रतीक' गुलाबाचं फुलंच का?

‘प्रेमाचे प्रतीक’ गुलाबाचं फुलंच का?

Subscribe

‘व्हॅलेंटाईन वीक ‘ला सुरुवात झाली आहे. सर्वत्र प्रेमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण अनेकांना गुलाबाचं फुल देऊन भावना व्यक्त करताना पाहिलं असेल. हजारो वर्षांपासून प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबाच्या फुलाकडे पाहण्यात येत. कारण काही असो, लाल गुलाब पाहिल्यावर कोणाच्याही मनात प्रेम आपुलकी, प्रेम आणि रोमान्सचे विचार जागृत होतात.

आई-बाबा, आजी-आजोबा आणि पिढ्यानपिढ्या या गुलाबाचे महत्व प्रेमाचे प्रतीक आणि इतर गोष्टींकरिता असल्याचे आपण ऐकतच आलो आहोत. पण, या प्रेमाच्या दुनियेत गुलाबाला अढळ स्थान कुठून आलं? नक्की काय आहे गुलाब आणि प्रेमाचे नाते? गुलाबाचे फुल रंग, सुगंध आणि सुंदरतेने परिपूर्ण असे आहे. गुलाबाचे फुल उगवण्यासाठी तितकेच कष्टही आहेत. मग तुमच्या जवळच्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सहज साधी सोपी गोष्ट तुम्ही द्याल का? म्हणूनच गुलाब हे इतर फुलांच्या तुलनेत खूप अनमोल आहे.

- Advertisement -

लैगिकतेची देवी आणि प्रेम देवता यांच्याशी संबंधित आहे गुलाबाची कथा

ग्रीक पौराणिक कथांमध्ये गुलाबाच्या फुलाबद्दल एक कथा सांगण्यात येते. ग्रीक देवी एफ्रोडाइटला प्रेम, लैगिकता आणि सौंदर्य याचे प्रतीक म्हटले जाते. असे सांगितले जाते की, एफ्रोडाइटचे सौंदर्य इतके जादुई होते की, ती जिथे जाई तिथे गुलाब उगवायचे. म्हणून लाल गुलाब हे प्रेम आणि शुभेच्छांचे प्रतीक मानले मानले जाते. एक अशीही कथा आहे ग्रीक देव ॲडोनिसशी संबंधित आहे. शिकार करताना एकदा रानडुकराने ॲडोनिस यांचा बळी घेतल्याचे सांगितले जाते. जिथे
ॲडोनिस यांचा मृत्यू झाला, तिथे पांढरे गुलाब होते. ते पांढरे गुलाब ॲडोनिस यांच्या रक्ताने लाल झाले. तेव्हापासून लाल गुलाब त्याग आणि उत्कटतेचे प्रतीक बनले. ग्रीक पौराणिक कथेनुसार, प्रत्येक प्रेमामध्ये त्याग आणि उत्कटता दोन्ही समाविष्ट असतात.

- Advertisement -

गुलाबासंदर्भात काही खास गोष्टी –

  • गुलाब हे 35 दशलक्ष वर्षापूर्वीचे आहे असे बोलले जाते.
  • रोमन काळात गुलाबाचा उपयोग खास करून अत्तर बनविण्यासाठी केलं जायचा.
  • गुलाब आपल्यासोबत अनेक प्राचीन काळापासून आहे. पण, एक उदयोग म्हणून गुलाबाच्या रोपांची लागवड जवळपासून 5000 वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरु झाली.
  • आजकाल बऱ्याच मुली ‘रोज वॉटर’चा वापर करता. पण, पहिल्यांदा 17 व्या शतकात ‘रोज वॉटर’ कायदेशीररित्या वापरण्यास सुरवात झाली.

गुलाबाचा हृदयावर आणि मनावर होतो सकारात्मक परिणाम –

एका संशोधनानुसार, गुलाब पाहिल्यावर मानवी मेंदूच्या त्या भागावर परिणाम होतो. जेथून मनाला शांतता मिळते. गुलाबाचा सुगंध केवळ तणाव कमी करत नाही, तर चांगली झोपही लागते. गुलाबाच्या रसामध्ये असलेले ‘रोज ऑक्सइड’ मनाला आराम देण्यास फायदेशीर ठरते. गुलाबाची लागवड योग्य प्रकारे केली असल्यास ते अन्नासाठी देखील वापरले जाऊ शकते. गुलकंद आणि गुलाबाच्या पानांपासून बनवलेल्या गुलाब पाण्यात पुरेशा प्रमाणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आढळतात, ज्याने स्ट्रेस कमी होतोय आणि प्रेम हार्मोन्स वाढतात.

 

 


हेही वाचा ; Rose Day 2024: ‘या’ कारणासाठी साजरा केला जातो ‘रोझ डे’!

 

- Advertisment -

Manini