Sunday, February 25, 2024
घरमानिनीRelationshipमहिलांना आवडत नाहीत पार्टनर च्या 'या' गोष्टी

महिलांना आवडत नाहीत पार्टनर च्या ‘या’ गोष्टी

Subscribe

अनेकदा रिलेशनशिपमध्ये झालेले वाद नातं तुटण्याचं कारण ठरतात. अनेकजण चर्चेतून या अडचणींवर मात करतात. त्यामुळं नात्यात संवाद हा फार महत्त्वाचा असतो. मात्र जेव्हा महिला नातं संपवण्याचा निर्णय घेते तेव्हा बर्‍याचदा महिलेलाच दोष दिला जातो. पण प्रत्येक वेळी महिलांचीच चुक नसते. त्यासाठी पुरुषांच्या काही सवयीही जबाबदार असतात. रिलेशनशिपमध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या अनेक गोष्टी पाहत असते. तुम्हाला त्या गोष्टी माहित आहेत का ? स्त्रियांना अनेकदा पुरुषांच्या काही सवयी आवडत नाहीत. या सवयी वेळीच बदलणे गरजेचे आहे, नाहीतर तुमचे नातेसबंध बिघडू शकतात. त्या सवयी कोणत्या आहेत, तेच आपण जाणून घेऊयात.

6 Ways Marriage Problems Turn Into Reasons For Divorce & Prevention

खोटे बोलणे – नात्यात पुरुष सतत खोटं बोलत असेल तर त्या नात्यातला विश्वास संपत जातो.  जोडीदार महिला त्याच्यावर संशय घेऊ लागते. त्यामुळं जर तुम्हाला खोटं बोलायची सवय असेल तर ती तातडीनं थांबवायला हवी. 


एक्सट्रा मॅरिटल अफेअर – कोणतीच महिला आपल्या नवऱ्याचं एक्सट्रा मॅरिटल अफेअर सहन करू शकत नाही. त्यामुळे जर पत्नीला तुम्ही फसवत असाल तर तुमचं नातं जास्त काळ टिकणार नाही.


आदर करणे – प्रत्येक नातं हे आदर आणि विश्वासावर उभं असतं. तुम्ही जर कालांतराने तुमच्या पार्टनरची किंमत करत नसाल, त्याच्यावर विश्वास ठेवत नसाल तर तुमची पत्नी नातं तोडू शकते. कारण कोणत्याही स्त्रीच्या मते आदर फार महत्वाचा असतो. 

5 Marriage Issues That Can Lead to Divorce (and How to Fix Them) - Serene Shift

- Advertisement -


नशा करणे – महिलांना अति प्रमाणात नशा करणारे पुरुष आवडत नाहीत. जर तुम्ही कधीतरी पार्टी किंवा मजामस्ती म्हणून घरात थोड्या प्रमाणात ड्रिंक करत असाल तर एकवेळ तुमची पत्नी हे मान्य करेल. पण तुम्ही जर दररोज नशा करत असाल तर ह्याने तुमच्या नात्यावर गंभीर परिणाम दिसायला सुरुवात होईल.  


राहणीमानातील सवयी – पुरुषांच राहणीमान हे अस्वच्छ आणि घाणेरडं असेल तर महिलांना ते आवडत नाही. त्यांना नेहमी स्वच्छ राहणारा आणि सुंदर दिसणारा पार्टनर हवा असतो. त्यामुळं ही सवय तुमच्यात असेल तर यात तात्काळ सुधारणा करणे गरजेचे आहे.

 


हेही वाचा ; नव्या सुनेचे स्वागत असे करा 

- Advertisment -

Manini