Wednesday, April 24, 2024
घरमानिनीRelationshipअहो आश्चर्य..जगात पहिल्यांदाच जन्माला आले तीन पालक असलेलं मूल

अहो आश्चर्य..जगात पहिल्यांदाच जन्माला आले तीन पालक असलेलं मूल

Subscribe

विज्ञानाचा चमत्कार आज संपूर्ण जग पाहतेय. अंतराळाचा प्रवास असो किंवा मेडिकल क्षेत्रात एखादी कामगिरी केली असो. मेडिकल सायन्सच्या प्रगतीचे प्रतीक म्हणून जगातील पहिलेच Superkid जन्माला आले आहे. वैज्ञानिकानी असे म्हटले आहे की, या बाळामध्ये कोणताही जेनेटिक आजार नाही आणि ना कोणताही नुकसानकारक जेनेटिक म्युटेशन, ज्यावर आपण कधीच उपचार करु शकत नाही. कारण हे बाळ तीन लोकांच्या डीएनच्या सहाय्याने जन्मले आहे.

हे बाळ इंग्लंमध्ये जन्मले आहे. आई-बाबांच्या डीएन व्यतिरिक्त या बाळासाठी तिसऱ्या व्यक्तीचा सुद्धा डीएनए वापरण्यात आला आहे. डीएनची खासियत कायम ठेवण्यासाठी IVF तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या बाळाला माइटोकॉन्ड्रियल डोनेशल ट्रिटमेंट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जन्मला घातले आहे.

- Advertisement -

वैज्ञानिकांनी एका हेल्दी महिलेचे एगचे उतक घेऊन IFV भ्रुण तयार केले होते. या भ्रुण मध्ये बायोलॉजिकल आई-वडिलांचे स्पर्म आणि एग्जला माइटोकॉन्ड्रियासोबत एकत्रित केले होते. आई-वडिलांच्या डीएनए व्यतरिक्त शरिरात तिसरी महिला डोनरचे जेनेटिक मटेरियल मधून 37 जीन टाकले गेलेय म्हणजेच थ्री-पॅरेंट बेबी. तर 99.8 टक्के डीएनए हे आई-वडिलांचेच वापरले गेले आहे.

MDT ला MRT म्हणजेच माइटोकॉन्ड्रिल रिप्लेसमेंट ट्रिटमेंट असे सुद्धा म्हटले जाते. ही पद्धत इंग्लंड मधील डॉक्टरांनी विकसित केली आहे. हे मुलं सुद्धा इंग्लंड मधील न्युकॅसल फर्टिलिटी सेंटरमध्ये जन्मले आहे. जगात जवळजवळ ६ हजारांपैकी एक मुल माइटोकॉन्ड्रियल आजार म्हणजेच गंभीर जेनेटिक आजाराने पीडित असते. असे बाळ जन्माला घालण्यामागे वैज्ञानिकांचे हेच उद्देश होते की, आई-वडिलांचे जेनेटिक आजार हा मुलांमध्ये ट्रांन्सफर होऊ नये.

- Advertisement -

MDT प्रोसेसमध्ये काय होते?
सर्वात प्रथम वडिलांच्या स्पर्मच्या मदतीने आईच्या एग्सला फर्टिलाइज केले जाते. त्यानंतर एखाद्या दुसऱ्या हेल्दी महिलेच्या एग्ज मधील न्युक्लियअर जेनेटिक मटेरियल काढून त्याला आई-वडिलांच्या फर्टिलाइज एग्जमध्ये एकत्रित केले जाते. यानंतर हे एग्जवर हेल्दी महिलेच्या माइटोकॉन्ड्रियाचा प्रभाव पडतो. असे सर्व झाल्यानंतर भ्रुणात ते टाकले जाते. या प्रक्रियेदरम्यान फार सावधगिरी बाळगावी लागते. तसेच मेडिकल सायन्सच्या दृष्टीकोनातून या प्रक्रियेत काही प्रकारची आव्हाने आणि धोके सुद्धा उद्भवतात.


हेही वाचा- Parenting Tips:पालकांनी फॉलो करायलाच हव्यात या गोष्टी

- Advertisment -

Manini