हिंदू धर्मानुसार, विवाहानंतर महिला आपल्या कपाळावर आणि भांगेमध्ये सिंदूर भरतात. धार्मिक मान्यतेनुसार, सिंदूर लावणे किंवा कुंकू लावणे याचा संबंध पतीच्या जिवनाशी असतो. आपल्या जीवनसाथी प्रति महिलांचा असणारा आदरभाव दर्शवणारे हे प्रतीक आहे. असंही म्हटलं जातं की भांगेमध्ये सिंदूर भरलेलं असणं हे महिला विवाहित असल्याचा एक संकेत आहे. ही परंपरा खूपच प्राचीन आहे आणि आजही ती निभावली जात आहे. परंतु तुम्हाला कपाळावर कुंकू लावण्याचे किंवा भांगेत सिंदूर भरण्याचे काही नियम ठाऊक आहेत का ? आजच्या लेखातून जाणून घेऊयात या काही महत्त्वपूर्ण नियमांविषयी.
खरंतर असं म्हटलं जातं की सूर्यास्तानंतर कपाळावर कुंकू किंवा सिंदूर लावू नये. मंगळवारीदेखील भांगेत सिंदूर भरु नये असे शास्त्रात सांगितले आहे. असं का आणि यामागील ज्योतिष नियम काय आहेत याबद्दल जाणून घेऊयात.
काय आहे सिंदूर लावण्याचे महत्त्व :
सिंदूर हे हळद आणि पारा यांच्या मिश्रणापासून बनलेले असते. ज्याचा रंग लाल असतो. ज्योतिष शास्त्रानुसार, सगळ्यात आधी लग्नाच्या वेळेस नवरा आपल्या पत्नीच्या भांगेत सिंदूर भरतो. यालाच सिंदूर दान असं म्हटलं जातं. या विधीला कन्यादान विधीप्रमाणेच महत्त्वपूर्ण मानण्यात आलंय. सिंदूर हे सुवासिनीचे प्रतीक समजले जाते. धार्मिक महत्त्वानुसार, सिंदूर हे पार्वतीमातेचा आशीर्वाद असल्याचे समजले जाते. असं म्हटलं जातं की यामुळे पार्वतीमातेचा कृपाशीर्वाद मिळतो आणि पतीला दीर्घायुष्य लाभते.
सूर्यास्तानंतर सिंदूर लावावे का ?
सिंदूर लावण्याबाबत एक खास नियम सांगितला जातो तो म्हणजे सूर्यास्तानंतर सिंदूर लावू नये. यामागे असं धार्मिक कारण सांगितलं जातं की सूर्यदेव हा ऊर्जेचा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. आणि तोच दिवसाच्या वेळांना नियंत्रित करत असतो. त्यामुळेच सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सिंदूर लावणे शुभ समजण्यात आले आहे. तर रात्रीनंतर चंद्राचे नियंत्रण असते. त्यामुळेच सूर्यास्तानंतर सिंदूर लावू नये यामुळे सकारात्मक प्रभाव मिळत नाही.
हेही वाचा : Expired Medicine Reuse Hacks : एक्सपायरी डेट झालेल्या औषधांचा असा करा वापर
Edited By – Tanvi Gundaye