हिंदू धर्मात बेलपत्राला खूप महत्त्व आहे. एकीकडे शिवलिंग पूजेदरम्यान बेलपत्राचा वापर केला जातो, तर दुसरीकडे ज्योतिषशास्त्रातही बेलपत्राला विशेष स्थान दिले जाते. बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा अपूर्ण मानली जाते, असे धार्मिक ग्रंथ सांगतात. पण त्याच धार्मिक शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की, काही देवी-देवतांच्या पूजेत चुकूनही बेलपत्राचा वापर करू नये. जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या देवतांना बेलपत्र अर्पण करू नये याविषयी.
भगवान विष्णूला बेलपत्र का अर्पण करू नये?
पौराणिक कथांनुसार, भगवान विष्णूने स्वतः वृंदा मातेला वरदान दिले होते की, श्री हरी नारायणाच्या पूजेमध्ये केवळ निसर्गाच्या रूपातील तुळशीलाच अर्पण करण्यात यावे आणि इतर कोणत्याही पानाला या पूजेत स्थान मिळणार नाही. या कारणास्तव भगवान विष्णूला बेलपत्र अर्पण केले जात नाही.
लक्ष्मीला बेलपत्र का अर्पण करू नये?
बेलपत्र लक्ष्मीलादेखील अर्पण केले जात नाही. यामागचे कारण म्हणजे बेलपत्राच्या पानात लक्ष्मीचा वास असतो. अशा स्थितीत तीच वस्तू स्वतः लक्ष्मीला अर्पण करून काय फायदा? यामुळेच लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळाचे फूल किंवा कमळाची वेल वापरली जाते.
मारूतीला बेलपत्र का अर्पण करू नये?
हनुमानाच्या पूजेमध्ये पिंपळाची पाने महत्त्वाची मानली जातात . असे मानले जाते की भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केले जात असल्याने हनुमानाला बेलपत्र अर्पण करणे योग्य नाही कारण ते शिवांश आहे. याचा थोडक्यात अर्थ असा की जी वस्तू वडीलधाऱ्यांना अर्पण केली जाते ती मुलाला अर्पण केली जात नाही.
देवी दुर्गाला बेलपत्र का अर्पण करू नये?
देवी दुर्गेच्या पूजेतही बेलपत्राचा वापर केला जात नाही. मात्र यामागील कारण काय आहे हे शास्त्रात स्पष्ट सांगितलेले नाही. देवी दुर्गेला बेलपत्र अर्पण करणे अशुभ होईल असे नाही पण दुर्गेच्या पूजेत बेलपत्राचा वापर निषिद्ध असल्याची लोकमान्यता प्राचीन काळापासून प्रचलित आहे.
हेही वाचा : Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का बनवतात ?
Edited By – Tanvi Gundaye