सध्या अनेकांना कष्ट करूनही कर्जाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. तुम्हीही कर्जात बुडत असाल तर वास्तुशास्त्रात वर्णन केलेले काही चमत्कारिक उपाय अवश्य करून पहा. वास्तुशास्त्रानुसार सांगितलेले उपाय केल्यास कर्जाची समस्या लवकर दूर होईल आणि येणाऱ्या नवीन वर्षात व्यक्तीला पैशाची कमतरता भासणार नाही. कर्जमुक्तीशी संबंधित वास्तु उपायांबद्दल जाणून घेऊयात.
या दिशेला तिजोरी ठेवा :
वास्तुशास्त्रानुसार, कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी घर किंवा दुकानातील तिजोरी उत्तर दिशेला ठेवावी. असे मानले जाते की या दिशेने सकारात्मक ऊर्जा घरात येते. याशिवाय लक्ष्मी आणि कुबेर देव यांचाही या दिशेला वास असल्याचे मानले जाते. या कारणास्तव या शुभ दिशेत पैसे ठेवल्याने कर्ज लवकर दूर होते आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात.
कर्जाची परतफेड करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम :
जर तुम्ही एखाद्याकडून कर्ज घेतले असेल तर ते परत करण्यासाठी मंगळवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. असे मानले जाते की मंगळवारी कर्ज परत केल्याने व्यक्तीला कर्जापासून लवकर मुक्ती मिळते.
या दिशेला लक्ष्मीची मूर्ती ठेवा :
वास्तूशास्त्रानुसार, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची मूर्ती किंवा चित्र दुकान किंवा कार्यालयाच्या उत्तर दिशेला ठेवावे आणि देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची दररोज विधिवत पूजा करावी. यामुळे कर्जाची समस्या दूर होते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यताहूी निर्माण होते. याशिवाय येणाऱ्या नवीन वर्षात व्यक्तीला पैशाची कमतरतादेखील भासत नाही.
पिंपळाच्या झाडाची पूजा करा :
कर्ज लवकर दूर करण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. तसेच दिवा लावावा आणि झाडाला प्रदक्षिणा घालावी व समस्येपासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करावी. असे मानले जाते की हा उपाय नि:स्वार्थी मनाने केल्याने कर्ज कमी होते आणि धनाची प्राप्ती होते.
हेही वाचा : Sankashti Chaturthi : संकष्टी चतुर्थीला करावेत हे उपाय
Edited By – Tanvi Gundaye