फुले ही त्यांच्या सौंदर्य आणि सुगंधासोबतच प्रेम आणि आशीर्वादाचे प्रतीक म्हणून देखील ओळखली जातात. मंदिरातून प्रसाद म्हणून मिळालेली फुले असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीने प्रेमाने दिलेले फूल असो. आपण त्याची कदर करतो. अशी भेटवस्तू म्हणून मिळालेली फुले आपण आपल्या पाकिटात आणि पुस्तकांच्या पानांमध्ये ठेवतो. पण, तुम्हाला माहिती आहे का की वाळलेली फुले पुस्तकात ठेवणे तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, पुस्तकाच्या पानांवर फुले ठेवणे शुभ मानले जात नाही.ताज्या फुलांच्या सुगंधाने घरात सकारात्मक ऊर्जा येते. जेव्हा ही फुले सुकतात तेव्हा ती मृत प्रतीक असतात. अशा परिस्थितीत, त्यांना जपून ठेवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही सुकलेली फुले पुस्तकात ठेवली तर ते कसे अशुभ ठरू शकते याविषयी जाणून घेऊयात.
वाळलेली फुले पुस्तकात ठेवणे अशुभ आहे का?
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, पुस्तकाच्या पानांमध्ये वाळलेली फुले ठेवण्याची सवय ही अशुभ मानली जाते. वाळलेली फुले नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि जीवनात अडथळे वाढवू शकतात.
नकारात्मक उर्जेचा प्रभाव
ज्योतिषशास्त्रानुसार, घरात किंवा पुस्तकांमध्ये वाळलेली किंवा सुकलेली फुले ठेवल्याने जीवनात नकारात्मकता वाढते. कारण ते नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. जर तुम्ही वाळलेली फुले पुस्तकात ठेवली तर नकारात्मक उर्जेमुळे तुम्हाला मानसिक ताण देखील जाणवू शकतो.
शिक्षण आणि करिअरवर परिणाम
जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्या पुस्तकातील एखाद्या व्यक्तीच्या आठवणीत किंवा आशीर्वाद म्हणून वाळलेली फुले ठेवत असाल तर त्याचा तुमच्या अभ्यासावर आणि स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर वास्तुशास्त्रानुसार , कोरडी फुले ठेवल्याने अभ्यासातील एकाग्रता कमी होते आणि यश मिळविण्यात अडथळे देखील निर्माण होऊ शकतात. ज्याचा थेट परिणाम करिअरवरही होतो.
नातेसंबंधांवर परिणाम
बऱ्याचदा आपण एखाद्याचे प्रेम समजून पुस्तकात वाळलेले फूल ठेवतो; याचा नातेसंबंधांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. असे मानले जाते की वाळलेली फुले ठेवल्याने नात्यांमध्ये अंतर निर्माण होते आणि प्रेमसंबंधांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.
आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, घरात किंवा पुस्तकात वाळलेली फुले ठेवल्याने आर्थिक नुकसानही होऊ शकते. इतकेच नाही तर वाळलेली फुले आर्थिक प्रगतीलाही बाधा आणू शकतात.
वाळलेल्या फुलांचे काय करावे?
ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुम्हाला मंदिरातून फुले मिळाली तर ती ताजी असेपर्यंत तुमच्या वहीत ठेवा. फुले सुकल्यावर त्यापासून कंपोस्ट बनवा आणि ते झाडांच्या आणि वनस्पतींच्या मुळांशी लावा. असे केल्याने तुम्ही आशीर्वाद म्हणून मिळालेल्या फुलांचा अनादरही तुमच्याकडून होणार नाही. पण, तुळस किंवा इतर कोणत्याही पवित्र झाडाला किंवा वनस्पतीला वाळलेल्या फुलांचे खत घालू नका. त्याच वेळी, जर तुम्ही एखाद्याचे प्रेम फुलाच्या रूपात जतन केले असेल, तेही तुम्ही खत म्हणून वनस्पतींमध्ये वापरू शकता.
हेही वाचा : Exercise : सकाळी की संध्याकाळी? व्यायाम करण्याचे मिळतील फायदे
Edited By – Tanvi Gundaye