वास्तू शास्त्रानुसार काही नियम सांगण्यात आले आहेत. असे म्हटले जाते की जर तुम्ही तुमच्या जीवनात वास्तू नियमांचे पालन केले तर ते वास्तू दोष दूर होतो आणि घरात व कुटुंबात सकारात्मक ऊर्जा वाहते. व्यक्तीच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी नेहमीच राहते. याच वास्तू नियमांनुसार इतरांच्या काही वस्तू जर आपण आपल्या घरी आणल्या तर आपल्या आयुष्यातील समस्या वाढू शकतात. यासाठीच जाणून घेऊयात काही खास वास्तू नियम.
ही चूक तुम्हाला पडू शकते महागात :
तुम्ही कदाचित पाहिले असेल की मंदिरांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी लोक बऱ्याचदा दुसऱ्यांच्या चप्पल आणि बूट घालतात. परंतु वास्तुशास्त्रात असे मानले जाते की असे केल्याने साधकाला जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. ज्या व्यक्तीच्या चप्पल आणि बूट तुम्ही घातले आहेत त्याचे दुर्दैव तुमच्यावरही येते असे मानले जाते.
भांडणे वाढू शकतात :
यासोबतच दुसऱ्या व्यक्तीच्या घरातील फर्निचरही तुमच्या घरात आणू नये. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, असे केल्याने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, ज्यामुळे कुटुंबात भांडणे वाढतात व तणावाचे वातावरण निर्माण होते.
या गोष्टीही ठेवा लक्षात :
बऱ्याच वेळा, गरज पडल्यास, आपण इतरांकडून छत्री मागतो. ही गोष्ट आपल्यासाठी अगदी सामान्य आहे परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून असे करणे अजिबात योग्य मानले जात नाही. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, इतरांकडून घेतलेल्या छत्र्या त्यांना लवकरात लवकर परत कराव्यात.
या गोष्टी मानल्या जातात अशुभ :
वास्तुशास्त्रात असेही मानले जाते की कधीही दुसऱ्याच्या घरातून गॅस स्टोव्ह किंवा शेगडी मागू नये. असे केल्याने कुटुंबाला मिळणारा लक्ष्मीचा आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद थांबू शकतो.यासोबतच, तुम्ही कधीही दुसऱ्याकडून आलेल्या लोखंडी वस्तू तुमच्या घरी आणू नयेत. असे मानले जाते की जेव्हा तुम्ही एखाद्याकडून लोखंडी वस्तू आणता तेव्हा शनिदेवही त्यासोबत घरात येतात. त्यामुळे घरातील अनेक समस्या वाढू लागतात.
हेही वाचा : Marathi Bhasha Gaurav Din : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गायिका सावनी रविंद्रचं फोटोशूट
Edited By – Tanvi Gundaye