घरात वास्तूदोष असणे संकटांना आमंत्रण दिल्यासारखे असते. असं म्हटलं जातं की घरात वास्तूदोष असणे व्यक्तीचं भाग्य बदलू शकते. आणि त्याच्या प्रगतीचे रस्ते बंद करू शकते. यासाठीच वास्तूदोषाचं निवारण करणं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
सामान्यत: लोकांना असं वाटतं की वास्तू दोष हा फक्त चुकीच्या दिशेला वस्तू ठेवल्यामुळेच होतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार वास्तूदोषाची अनेक कारणं असू शकतात.
घरातील असं एखादं स्थान जिथे अजिबात प्रकाश पोहचू शकत नाही आणि जेवणाच्या वेळी अंधार असतो. त्या जागेवर असलेली प्रत्येक गोष्ट नकारात्मक ऊर्जा वास्तूदोष निर्माण करू शकते. याव्यतिरिक्त घरातील स्वयंपाकघर आणि मंदिर या ठिकाणी असणारी अस्वच्छतादेखील वास्तूदोषाचे कारण ठरू शकते. घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर बूट-चप्पल काढणे घरातील वास्तूदोषाचे कारण ठरू शकते.
वास्तूदोषाची लक्षणे :
कोणत्या न कोणत्या आजारामुळे घरातील सदस्यांचं आरोग्य बिघडू शकते. घरात वास्तूदोष असण्याचं हे लक्षण आहे. याशिवाय, जर अचानक घराची आर्थिक स्थिती बिघडत असेल तर हेदेखील वास्तूदोषाचं एक लक्षण असू शकतं. कुटुंबातील तणाव आणि आपापसात असणारा वाद किंवा मानसिक गोंधळ वाढणं हीसुद्धा वास्तूदोषचीच लक्षणे आहेत.
वास्तूदोषाचा प्रभाव कसा होतो?
वास्तूदोष घरात असण्याचा प्रभाव केवळ घरापुरताच मर्यादित नसतो. वास्तूदोषाचा परिणाम घरातील सदस्यांच्या कार्यस्थळावर आणि अन्य ठिकाणीही होत असतो. घरात वास्तूदोष असल्यास नोकरीची प्रगती थांबते. संपत्तीची हानी होऊ लागते, आर्थिक समस्या निर्माण होते. कर्जासारख्या अडचणी निर्माण होतात. व्यापार करणाऱ्यांचा धंदा बंद होतो. आणि त्यांना तोटा होऊ लागतो.
हेही वाचा : Vastu Tips : पूजेच्या ताटात पैसे का ठेवतात ?जाणून घ्या
Edited By – Tanvi Gundaye