फुलांना शुद्धता आणि पावित्र्याचे प्रतीक मानले जाते. हेच कारण आहे की, शुभ कार्यांमध्ये देवी-देवतांच्या पूजेसासाठी फुलांना विशेष महत्त्व आहे. खरंतर प्रत्येक देवांना त्यांना आवडत असलेली फुल वाहिली जातात. अशातच येत्या 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. यावेळी गणपतीला जे काही आवडतं त्या सर्व गोष्टी केल्या जातात. गुळ-खोबरं असो किंवा जास्वंदाची फुलं असो, सर्वकाही केले जाते. मात्र तुम्हाला माहितेय का, गणपतीला जास्वंदासह पारिजातकाचे फुल ही सर्वाधिक प्रिय आहे.
पुराणांच्या मते, पारिजातकाचे फुल हे स्वर्गातून आले आहे. हे फूल हरसिंगार या नावाने सुद्धा ओळखले जाते. या फुलाला अधिक सुगंध नसतो. पण ते फार अलौकिक मानले जाते. हेच कारण आहे की, गणपतीला हे फुलं अत्यंत प्रिय आहे. गणेशोत्सवानिमित्त दुर्वासह पारिजातकाची फुलं सुद्धा गणपतीला वाहिली जातात. यामुळे बाप्पा प्रसन्न होतो.
हरिवंश पुराणात परिजातकाच्या फुलाला कल्पवृक्षाचे नाव दिले गेले आहे. त्यानुसार पारिजातकाची उत्पत्ती सागर मंथनादरम्यान झाली होती. स्वर्गातील लोकांमध्ये केवळ उरवशी अप्सरेलाच या वृक्षाला स्पर्श करण्याचा अधिकार होता. अप्सरा आपला थकवा या झाडाला स्पर्श करून दूर करायची. आज सुद्धा अशी मान्यता आहे की, याच्या सावलीत बसल्याने सर्व थकवा दूर होतो. या व्यतिरिक्त पारिजातक असे एक फूल आहे जे जमीनीवर जरी पडले तरीही ते पुजेसाठी वापरता येते.
हेही वाचा- हरितालिकेला शिवलिंगाची पूजा का केली जाते? वाचा शुभ मुहूर्त