Friday, September 29, 2023
घर मानिनी Religious रात्रीच्या वेळेस केस मोकळे सोडून झोपणे टाळा

रात्रीच्या वेळेस केस मोकळे सोडून झोपणे टाळा

Subscribe

आपल्या धर्म शास्रांमध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे त्याचा थेट संबंध आपल्या आयुष्याशी आहे. असे मानले जाते की, शास्रात लिहिण्यात आलेल्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येतात. मात्र त्यांचे पालन न केल्यास आयुष्यात काही समस्यांचा सामना करावा लागतो.(sleeping with open hair)

आपल्याला घरातील वडीलधारी माणसे नेहमीच सांगतात की, रात्रीच्या वेळी नखं कापू नये, एखाद्या विशेष दिवसावेळी केस धुवू नये किंवा केस कापण्यासंदर्भातील काही नियमांचे पालन करावे. या व्यतिरिक्त जेवणाआधी आणि नंतर शास्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळेस केस मोकळे सोडणे किंवा मोकळ्या केसांनी मंदिरात प्रवेश करू नये असे ही शास्रात म्हटले आहे.

- Advertisement -

जेव्हा शास्रात लिहिलेल्या नियमांचा मुद्दा येतो तेव्हा अशा काही गोष्टी आहेत ज्या महिलांशी संबंधित आहेत आणि त्याचे पालन महिलांनी आवश्यक केले पाहिजे. अशातच रात्रीच्या वेळेस केस मोकळे सोडून झोपावे का? याबद्दल शास्र काय सांगते हे पाहूयात.

नकारात्मकतेचे कारण ठरू शकते
आधुनिक काळात आपल्या सर्वांनाच केस मोकळे सोडणे आवडते. एखाद्या पार्टीत जायचे असो किंवा खास फंक्शनला तेव्हा आपण केसांची स्टाइल कशी असावी याकडे आवर्जुन लक्ष देतो.

- Advertisement -

ऐवढेच नव्हे तर बहुतांशजण रात्रीच्या वेळी केस मोकळे सोडून झोपणे पसंद करतात. मात्र शास्रानुसार असे करणे एखाद्या दु:खाचे किंवा शोकचे प्रतीक मानले जाते.

नकारात्मक उर्जा अधिक सक्रीय असते
असे मानले जाते की, रात्रीच्या वेळी नकारात्मक उर्जा अधिक सक्रीय असतात. त्यामुळे रात्री केस मोकळे सोडून झोपू नये. जेणेकरुन एखादी नकारात्मक उर्जा तुमच्यावर हावी होण्यापासून दूर रहाल. या व्यतिरिक्त तुम्ही अधिक चिडचिडे सुद्धा होऊ शकता आणि असे करणे आयुष्यात तणावाचे कारण ही ठरू शकते. रात्रीच्या वेळेस केस मोकळे सोडणे तुमच्या मेंदूसह संपूर्ण आरोग्यावर प्रभाव टाकू शकते.

परिवारात येऊ शकतात समस्या
जेव्हा तुम्ही केस मोकळे सोडून झोपता तेव्हा तुमच्या आयुष्यात काही समस्या उद्भवू शकतात. ज्योतिषांच्या मते, घरातील मंडळींसोबत तुमचे वाद होऊ शकतात आणि तुमच्यात उदासीनता येऊ शकते.


हेही वाचा- कुंडलीतील अशुभ चंद्रामुळे वाढतो मानसिक ताण; करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini