घरात चप्पल किंवा बूट घालून फिरू नये असे घरातील मोठी मंडळी आपल्याला कायमच सांगत असतात. कारण वास्तुशास्त्रानुसार, घरात चप्पल बूट घालून वावरणे अशुभ मानले गेले आहे. शास्त्रामध्ये घरात चप्पल घालू नये असे सांगण्यात आले असले तरी याला वैज्ञानिक कारण सुद्धा आहे.
घरात चप्पल न घालण्याचे धार्मिक कारण –
वास्तू शास्त्रानुसार घराच्या अंगणात ब्रह्माचा वास असतो. तर घराला मंदिराचा दर्जा देण्यात आला आहे. घराच्या तिजोरीत देवी लक्ष्मीचा वास असतो. एकंदरच, घर ही पवित्र वास्तू आहे. त्यामुळे आपण तिचे पावित्र्य जपायला हवे. पण जेव्हा आपण बाहेरून चप्पल घालून घरात येतो तेव्हा चप्पल किंवा बुटाच्या माध्यमातून बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. यामुळे संपूर्ण घरावर याचा परिणाम व्हायला सुरुवात होते. म्हणून, शास्त्रानुसार घरात चप्पल किंवा बूट घालणे वर्ज्य मानले आहे. वास्तुदोष निर्माण होतो. लक्ष्मी देवी नाराज होते असे म्हटले जाते , ज्यामुळे आर्थिक समस्या जाणवू शकतात.
घरात चप्पल न घालण्याचे वैज्ञानिक कारण –
घरात चप्पल – बूट घालून वावरू नये यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे जेव्हा आपण बाहेरून घरात येतो तेव्हा चपलांसोबत घाणही घरात येते. घाणीसोबत बॅक्टरीया, कीटक घरात प्रवेश करतात आणि ही गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसते. यामुळे घरातील मंडळी आजारी पडू शकतात. त्यामुळे घरात चप्पल – बूट घालून फिरणे योग्य नाही.
हेही पाहा :
Edited By – Chaitali Shinde