Wednesday, May 31, 2023
घर मानिनी Religious लग्नाआधी वधू-वराला मेहंदी का लावली जाते?

लग्नाआधी वधू-वराला मेहंदी का लावली जाते?

Subscribe

भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला खूप विशेष मानले जाते. भारतीय लग्नांमध्ये लग्नाच्या काही दिवस हळद, मेहंदी, संगीत असे अनेक कार्यक्रम देखील साजरे केले जातात. लग्नाआधी मेहंदी काढणं देखील शुभ मानलं जातं. यामध्ये वधू आणि वरच्या हातांवर आणि पायावर मेहंदी लावली जाते. परंतु लग्नाआधी मेहंदी लावण्याचे खरे कारण नक्की काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लग्नाआधी मेहंदी का लावली जाते?

ArtBox Studio - Price & Reviews | Badlapur Photographer

- Advertisement -

 

शास्त्रात, मेहंदीला सोळा श्रृंगारांपैकी एक मानले जाते. मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. लग्नात मेहंदी लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. मेहंदीमुळे वधूच्या सौंदर्यात भर पडते. मेहंदीला प्रेमाचे प्रतीक देखील मानले जाते. त्याच्या रंगाबद्दल असे म्हटले जाते की, मेहंदीचा रंग जितका उजळ असेल. त्या वधूचा जोडीदार तिच्यावर तितकेच प्रेम करेल.

मेहंदी लावण्यामागचे वैज्ञानिक कारण

- Advertisement -

Sawan 2021: How To Make Mehndi aka Henna Cone at Home | how to make mehndi aka henna cone at home | HerZindagi

मेहंदीचा उपयोग प्राचीन काळी आयुर्वेदिक औषध म्हणूनही केला जात होता. असे मानले जाते की, लग्नाच्या वेळी वधू आणि वर दोघेही खूप तणावाखाली असतात. मेहंदीची प्रकृती थंड असल्यामुळे ती शरीराचे तापमान राखून शरीराला थंडावा देते. म्हणूनच वधू-वरांना मेहंदी लावली जाते.


हेही वाचा :

रात्री झोपताना उशीखाली ‘या’ वस्तू ठेवल्यास होईल लाभ

- Advertisment -

Manini