Prepare time: 1hr
Cook: 25 - 30 min
Ready in: 1hr 20 mins
Ingredients
- बोनलेस चिकन - अर्धा किलो
- क्रीम - 1 चमचा
- दही - 3 कप
- मिरपूड - 1 चमचा
- कॉर्न फ्लॉवर - 2 ते 3 चमचे
- गरम मसाला - अर्धा चमचा
- वेलची पावडर - चिमूटभर
- हिरव्या मिरचीची पेस्ट
- आलं-लसणाची पेस्ट - 1 चमचा
- आमचूर पावडर - अर्धा चमचा
- मीठ
- तेल
Directions
- सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवून घ्यावे.
- एका बाऊलमध्ये दही, कॉर्न फ्लॉवर, वेलची पावडर, गरम मसाला, हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं-लसणाची पेस्ट, आमचूर पावडर, मिरपूड एकत्रित करुन घ्यावे.
- तयार मिश्रणात चिकनचे पीस टाकून एक तास मॅरीनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
- तासाभरानंतर चिकनचे पीस स्टीकवर एक-एक करुन लावून घ्यावेत.
- एका चिकन पीसनंतर सिमला मिरची, टोमॅटो, कांदा चिरून लावू शकता.
- तयार स्टिक्स 15 मिनिटे ग्रील करा किंवा तुम्ही एका पॅनमध्ये बटर, तेलात शिजवून घेऊ शकता.
- तयार टिक्क्यावर चाट मसाला घालून चिकन मलाई टिक्का सर्व्ह करण्यास तयार झाला आहे.