Prepare time: 20 min
Cook: 25 - 30 min
Ready in: 45 min
Ingredients
- बटाटा - 1
- सिमला मिरची - 1
- फ्लॉवर - अर्धा
- टोमॅटो -1
- गाजर -1
- आल्याचा तुकडा
- मटार- वाटीभर
- किसलेलं खोबरं - वाटीभर
- तीळ
- लाल मिरची -1 ते 2
- लाल तिखट
- धणे पावडर
- गरम मसाला
- हळद
- जिरं
- मीठ
Directions
- सर्वात आधी सर्व भाज्या धुवून त्याचे काप करावेत.
- यानंतर मिक्सरमध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा बारीक करून घ्यावे.
- कढईत तेल गरम करुन त्यात बटाटे, फ्लॉवर, गाजर, सिमला मिरची टाकून सोनेरी रंगाचे होईपर्यत परतून घ्यावेत.
- दुसरीकडे एक पॅन गरम करण्यास ठेवा. त्यात तीळ, जिरे, किसलेले खोबरं हलके भाजून घ्यावेत.
- सर्व मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
- पुन्हा कढईत तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर हिंग, हळद, धणे पूड टाकून परतून घ्यावे.
- आता यात टोमॅटो आणि सर्वाची पेस्ट मिक्स करावी.
- आवश्यकतेनुसार लाल तिखट, गरम मसाला चवीनुसार मीठ टाकावे.
- मसाल्याला तेल सुटले की, त्यात मटार, तळलेल्या भाज्या घाल्याव्यात.
- यानंतर भाजी 4 ते 5 मिनिटे शिजू द्यावी.
- तुमची व्हेज कोल्हापूरी तयार झाली आहे.
- फक्त सर्व्ह करण्याआधी चिरलेली कोथिंबीर भाजीवर गार्निशींगसाठी टाकावी.