तुळशीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. शास्त्रानूसार, दररोज घरात तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि शुभ परिणाम दिसू लागतात. तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरात तुळशीचे रोप लावायलाच हवे. तुळशीला जसे अनन्यसाधारण महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे त्याचप्रमाणे तुळशीची पाने तोडण्याचे नियमही सांगण्यात आले आहेत. जर तुळशीच्या या नियंमाचे पालन केले नाही तर आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे जाणून घेऊयात, तुळशीची पाने तोडताना काय लक्षात घ्यायला हवे.
तुळशीची पाने तोडण्याचे नियम –
नखांनी तोडू नये –
नखांनी तुळशीची पाने तोडणे अशुभ मानले जाते. तुळशीची पाने नखांनी कधीही तोडू नयेत, त्याऐवजी पाने कायम हलक्या हातांनीच तोडावीत.
आंघोळ न करता स्पर्श करू नये –
शास्त्रानुसार, तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. त्यामुळे चुकूनही आंघोळ न करता तुळशीला स्पर्श करू नये. आंघोळ न करता तुळशीला स्पर्श करणे अशुभ मानले जाते.
परवानगी महत्तवाची –
शास्त्रानुसार, तुळशीची पाने तोडण्याआधी रोपासमोर हात जोडून देवी लक्ष्मीला विनंती करूनच पाने तोडावीत.
चप्पल,बूट घालू नये –
तुळशीची पाने तोडताना चप्पल किंवा बूट घालू नयेत, असे करणे अशुभ मानले जाते.
संध्याकाळी तोडणे वर्ज्य –
संध्याकाळी चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत. असे केल्याने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तसेच सुर्यास्तानंतर तुळशीला पाणी घालणे देखील वर्ज मानले जाते.
या दिवशी तोडणे वर्ज्य –
एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे वर्ज्य मानले जाते. जर तुम्हाला भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करायची असतील तर एक दिवस आधीच तुळशीची पाने तोडून ठेवू शकता. तसेच एकादशीव्यतिरीक्त चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, अमावस्या, द्वादशी आणि चतुर्थीला चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत.
हेही घ्या लक्षात –
- तुळशीची पाने चाकू, कात्रीने तोडू नयेत.
- तुळशीची पाने कधीच शिळी होत नाही.
- सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा अवश्य लावावा, असे करणे शुभ मानले जाते.
- घरातील तुळस सुकलेली असेल तर ते जमिनीत गाडावे किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे.
- नवीन तुळशीचे रोप घरात गुरूवारी लावणे शुभ मानले जाते.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde