Tuesday, February 11, 2025
HomeमानिनीReligiousVastu Tips : घरात घोड्याची मूर्ती ठेवणे शुभ की अशुभ?

Vastu Tips : घरात घोड्याची मूर्ती ठेवणे शुभ की अशुभ?

Subscribe

घरात सुख-शांती नांदावी, असे प्रत्येकाला वाटते. घरातील सुख-शांतीसाठी वास्तू महत्वाची भूमिका बजावते. असे म्हणतात की, घराची वास्तू व्यवस्थित असेल तर प्रगतीचे सर्व दरवाजे उघडतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. घराची वास्तू व्यवस्थित नसेल तर व्यक्तीला आयुष्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी वास्तूशास्त्रात सांगण्यात आलेले उपाय करणे फायद्याचे ठरेल. उपायांमध्ये जीवनात सकारात्मक परिणामासाठी काही गोष्टी घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. शास्त्रात फेंगशुईमध्ये घरात घोड्याची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे आश्चर्यकारक फायदे होतात असं म्हणतात. घोड्याच्या मूर्तीचा आयुष्यावर कसा सकारात्मक प्रभाव पडतो आणि मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी जाणून घेऊयात.

  • घोडा वेग, शक्ती आणि यशाचे प्रतीक आहे. घरात घोड्याची मूर्ती ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
  • घरात घोड्याची मूर्ती ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
  • घोड्याच्या मूर्तीला संपत्तीचे प्रतिक मानले जाते. उत्तर दिशेला मूर्ती ठेवल्यास आर्थिक अडचणी कमी होतात.
  • उत्तर दिशेला घोड्याची मूर्ती ठेवल्यास प्रगतीतील अडथळे दूर होतात आणि यश तुमच्या दारी येते.
  • घरातील कलह दूर करण्यासाठी घोड्याची मूर्ती ठेवणे फायद्याचे ठरेल.
  • घरात कोणी दिर्घकाळ आजारी असेल तर घोड्याची मूर्ती घरात ठेवावी.

या दिशेला ठेवा मूर्ती –

  • घराच्या उत्तर दिशेला घोड्याची मू्र्ती ठेवणे शुभ मानले जाते. या दिशेला तुम्ही जर मूर्ती ठेवलीत तर सकारात्मक परिणाम सुरू होतात. घरातील वातावरण आनंददायी होते.
  • व्यापारात किंवा नोकरीत अडचणी येत असतील तर घरात घोड्याची मूर्ती उत्तर दिशेला ठेवावी.
  • दक्षिण दिशेला घोड्याची मूर्ती ठेवणं शुभ मानले जाते. या दिशेला मूर्ती ठेवल्यास सामाजिक प्रतिष्ठा वाढते आणि आयुष्यातील संकटे दूर होतात.

घोड्याशिवाय हे प्राणीही ठेवू शकता.

  • बेडरूममध्ये दोन हंसाचे चित्र लावणे शुभ मानले जाते. यामुळे पती-पत्नीचे वैवाहिक आयुष्य सुधारते.
  • घरात पितळेचा किंवा चांदीचा मासा ठेवल्याने सुख-समृद्धी येते.
  • अनेक घरांमध्ये वासराला दूध पाजणाऱ्या कामधेनू गायीची मूर्ती असल्याचे आपण पाहतो. गायीची मूर्ती ठेवल्याने मूल होण्यासोबतच मूल आनंदी राहतात.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini