Monday, March 17, 2025
HomeमानिनीRecipeSago ladoo : पौष्टिक साबुदाणा लाडू

Sago ladoo : पौष्टिक साबुदाणा लाडू

Subscribe

लाडू हा घरोघरी बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. बेसनाचे लाडू, अळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू असे अनेक लाडूंचे प्रकार आपल्याला माहीत आहेत. परंंतु उपवासासाठी खास बनवला जाणारा साबुदाणा लाडू फार कमी जणांना ठाऊक आहे. आज आपण पाहूयात साबुदाण्याच्या लाडूंची झटपट होणारी आणि पौष्टिक रेसिपी.

Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min

Ingredients

  • साबुदाणा - 1 वाटी
  • पिठीसाखर - 3/4 वाटी
  • साजूक तूप - 1/2 वाटी
  • चिरलेले ड्रायफ्रूट्स - आवडीनुसार

Directions

  1. एका तव्यामध्ये साबुदाणा 15 मिनिटांकरता मंद आचेवर परतून घ्यावा. मग तो ताटात काढून घ्यावा.
  2. आता साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा.
  3. त्यात गरजेप्रमाणे तूप , ड्रायफ्रूट्स आणि पिठीसाखर घालून त्याचे लाडू वळावेत.
  4. अशाप्रकारे साबुदाणा लाडू तयार आहेत.

Manini