Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- पनीर - 150 ग्रॅम
- खवा - अर्धी वाटी
- वेलची - 4
- केसर - चिमूटभर
- साखर किंवा गूळ - 6 चमचे
- उभे चिरलेले बदाम - 6 ते 7
Directions
- पनीर, खवा आणि साखर किंवा गूळ एकत्र करून घ्या.
- तुम्ही हे मिक्सरमध्ये एकत्र करू शकता किंवा वाटीच्या मागील भागाचा वापर करून त्यांना एकत्र मॅश करू शकता.
- आता यात वेलची मिसळा आणि जवळपास अर्ध्या इंचाच्या जाडीमध्ये याला ताटात पसरवून घ्या.
- मिश्रण छान सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
- सेट झाल्यानंतर त्याचे चौकोनी आकारात किंवा तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुकडे कापून घ्या.
- अशाप्रकारे संदेश मिठाई तयार आहे.