Prepare time: 20 min
Cook: 25 - 30 min
Ready in: 45 min
Ingredients
- सुकी लाल मिरची
- आल्याचा मोठा तुकडा
- व्हिनेगर - 3 - 4 चमचे
- सोया सॉस - 2 चमचे
- लसणाच्या पाकळ्या - 15 ते 20
- मीठ
- तेल
Directions
- लाल मिरच्यांमधील बिया काढून घ्याव्यात आणि मिरच्या कोमट पाण्यात भिजत ठेवा.
- जवळपास अर्धा तासाने मिरच्या पाण्यात काढा, त्या फूललेल्या तुम्हाला दिसतील
- मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा.
- यानंतर पॅनमध्ये 6 ते 7 चमचे तेल घालावे, तेल थोडे जास्तच घालावे.
- तेल गरम झाले की, त्यात बारीक चिरलेले लसूण आणि आले परतून घ्या.
- आले-लसूण गोल्डन रंगाचे होईपर्यत भाजल्यावर गॅस बारीक करून मिरचीची पेस्ट परतून घ्यावी.
- व्यवस्थित मिश्रण भाजल्यानंतर चटणीला तेल सुटू लागेल.
- तेल सुटल्यावर मिश्रणात सोया सॉस, व्हिनेगर आणि मीठ टाकून घ्यावे.
- सर्व मिश्रण पुन्हा 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावे.
- तुमची शेजवान चटणी तयार झाली आहे.