हिवाळा सुरू होताच शरीरासह त्वचेच्या तक्रारी सुरू होतात. थंडीच्या दिवसात त्वचेचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी महागडे स्किन केअर प्रॉडक्ट वापरले जातात. यासाठी खिशाला कात्री बसते ते वेगळी गोष्ट. अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता केवळ यासाठी तुम्हाला सिझनल फ्रुटची मदत घ्यावी लागेल. हिवाळ्यात येणारी हंगामी फळे आरोग्यासाठी उपयुक्त असतातच शिवाय त्वचेसाठी फायदेशीर असतात. हंगामी फळांमध्ये असणारे पोषक तत्वे त्वचेचे आरोग्य राखतात. त्यामुळे जाणून घेऊयात, कोणती सिझनल फ्रूट त्वचेला ग्लो देण्यासाठी उपयुक्त ठरतात.
आंबट फळे –
संत्री, लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी मुळे त्वचेला पोषण मिळते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि त्वचेच्या समस्या उद्भवत नाही. तुम्ही संत्र्याचा फेस मास्कही वापरू शकता.
पपई –
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय पपेन एन्झाइम पपईत असते, जे त्वचेच्या एक्सफोलिएशनसाठी उपयुक्त ठरते आणि त्वचेचा पोत सुधारतो.
नाशपती –
नाशपती शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ओळखले जाते. यासह यात मुबलक प्रमाणात फायबर आढळते. नाशपतीच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत मिळते आणि त्वचा मऊ होते.
आवळा –
व्हिटमिन सी चा मुख्य स्त्रोत म्हणून आवळ्याकडे पाहिले जाते. आवळा खाल्ल्याने शरीर डिटॉक्सिफाय होते आणि मुरूमांपासून शरीराचा बचाव होतो.
सीताफळ –
सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेला पोषक ठरतात. तुम्ही थंडीतील हे सिझनल फ्रूट नक्कीच खायला हवे.
डाळिंब –
डाळिंबमध्ये अॅटी-ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे त्वचा तरूण दिसण्यास मदत होते. तुम्ही डाळिंबाचे स्क्रबही त्वचेवर लावू शकता. यामुळे त्वचेचा पोत सुधारला जाईल.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde