Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- 200 ग्रॅम पनीर (चौकोनी तुकडे)
- 2 मध्यम टोमॅटो (प्युरीसाठी)
- 1 मोठा कांदा (चिरलेला)
- 8 ते 10 काजू
- 1/2 कप दूध किंवा क्रीम
- 1/2 चमचे आले-लसूण पेस्ट
- 2 चमचे तूप / बटर
- 1/2 चमचे हळद
- 1चमचा लाल तिखट
- 1 चमचा गरम मसाला
- 1/2 चमचे धणे पूड
- 1/2 चमचे जिरे
- 1 चमचे कसूरी मेथी
- मीठ चवीनुसार
Directions
- तुपात किंवा बटरमध्ये जिरे घाला.
- त्यामध्ये चिरलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट घाला, सोनेरी रंग येईपर्यंत परता.
- टोमॅटो प्युरी घाला आणि तेल सुटेपर्यंत शिजवा.
- नंतर त्यामध्ये हळद, तिखट, धणे पूड आणि मीठ घाला.
- काजू पेस्ट आणि दूध घाला, व्यवस्थित ढवळा.
- ग्रेव्ही दाटसर झाल्यावर पनीरचे तुकडे आणि कसूरी मेथी घाला.
- त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे मंद आचेवर शिजवा.
- आता गरम मसाला घालून गॅस बंद करा.
- आता गरमागरम शाही पनीर तयार आहे.
- या शाही पनीरचा आस्वाद तुम्ही नान किंवा जीरा राईससोबत घेऊ शकता.