Prepare time: 15 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min
Ingredients
- शेवया - 1 कप
- कांदा - अर्धा चिरलेला
- टोमॅटो -अर्धा चिरलेला
- वाटाणे - मुठभर
- कोथिंबीर - बारीक चिरलेली
- मिरची -2 ते 3
- कढीपत्याची पाने
- तेल
- मोहरी
- हळद
- मीठ
Directions
- एका भांड्यात पाणी उकळण्यास ठेवा. पाणी उकळले की, त्यात 2 थेंब तेल टाका आणि शेवया शिजवून घ्या.
- शेवया शिजल्या की, पाणी काढून टाका.
- दुसरीकडे कढईत तेल टाका. तेल गरम झाले की, त्यात मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्याची पाने, हळद फोडणीला द्या.
- यात आता कापलेला कांदा परतून घ्या.
- कांदा गुलाबीसर झाला की, सर्व भाज्या कापून त्यात घाला.
- उकळलेले पाणी टाकून एक उकळी आणा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात शेवया मिक्स करून घ्या.
- आता चवीनूसार मीठ आणि बारिक चिरलेली कोथिंबीर घाला.
- तुमचा झटपट तयार होणारा शेवयांचा उपमा तयार झाला आहे.