आपले केस सुंदर, सिल्की आणि सॅाफ्ट असावे अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण, बदलत्या लाइफस्टाइलनुसार बऱ्याच महिलांना केसांच्या विविध समस्या जाणवत आहे. यावर उपाय म्हणून अनेक महागडे हेअर प्रॅाडक्ट वापरले जातात. कुणी तेल लावून ठेवतं तर कुणी डाएट फॅालो करतो. काही जण तर केसांची हेअरस्टाइल सुद्धा चेंज करतात. काही जण तर केसांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाइल करतात.
दिवसभरात आपण केसांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाइल करतो. पण, रात्री झोपताना केस मोकळे सोडावे की वेणी बांधून असा प्रश्व अनेक जणींसमोर असतोच. खरं तर हेल्दी केसांसाठी रात्री केस मोकळे सोडून न झोपता वेणी बांधून झोपायला हवे. कारण रात्री केस मोकळे सोडून झोपल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आपण बऱ्याचदा झोपताना कुशी बदलतो. अशाने केस अधिक तुटण्याची शक्यता असते.
वेणी बांधून झोपल्याचे फायदे –
केसांची वेणी किंवा केस बांधून झोपल्याने केस कमी तुटतात.
केस बांधून झोपल्याने केस गळतीची समस्या कमी होते.
रोज रात्री झोपताना वेणी बांधल्याने शांत झोप लागते.
झोपताना वेणी बांधल्याने केस दाट आणि मजबूत होतात.
वेणी बांधल्याने केसांमध्ये गुंता निर्माण होत नाही.
केस मोकळे सोडल्याने केसात कोंडा, धूळ जमा होते. पण, जर केसांची वेणी बांधली तर या समस्या निर्माण होत नाही. केस देखील स्वच्छ राहतात.
रात्री आपण जेव्हा डोके उशीवर ठेवून झोपतो तेव्हा उशीवर केस घासून ते जास्त ड्राय होऊ शकतात. त्यामुळे केसांची वेणी बांधून झोपावे.
केसांच्या निरोगी आरोग्यासाठी वेणी बांधणे योग्य असले तरी केसांची सैलसर वेणी बांधायला हवी.
हेही पाहा :
Edited By – Chaitali Shinde