Sunday, March 16, 2025
HomeमानिनीFashionSkin Care Tips : हातांचे टॅनिंग असे करा दूर

Skin Care Tips : हातांचे टॅनिंग असे करा दूर

Subscribe

बदलत्या लाइफस्टाइलनूसार हल्ली बऱ्याच जणांना टॅनिंगची समस्या उद्भवत आहेत. यावर उपाय म्हणून महिला बाजारात मिळणारे महागडे स्किन केअर प्रॅाडक्ट खरेदी करतात आणि वापरतात. पण, मनासारखा परिणाम मिळत नाही. अशावेळी, हातांचे टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. यात तुम्हाला दही आणि बेसनचा वापर करावा लागेल.

साहित्य –

  • दही
  • बेसन

कसे वापराल ?

  • एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे बेसन आणि 2 चमचे दही घ्या.
  • या दोन्ही एकत्र मिक्स करून घ्याव्यात.
  • तयार मिश्रण ब्रशच्या मदतीने हातावर लावून घ्या.
  • आता 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज करून घ्या.
  • जवळपास 20 मिनिटे तसेच असूद्या.
  • 20 मिनींटानंतर कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्या.
  • दही आणि बेसनचा हा पॅक आठवड्यातून 3 वेळा तुम्ही वापरू शकता.

बेसनाचे फायदे –

बेसन हे त्वचेवरील काळपटपणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच त्वचेवरील कोणत्याही प्रकारचे स्किन इन्फेक्शन रोखण्यासाठी उपयुक्त ठरते.

दह्याचे फायदे –

दह्यामुळे त्वचेवर असलेले अॅटी एजिंग कमी होतात आणि त्वचा दीर्घकाळ तेजस्वी आणि तरुण दिसते.

 

 

 

 

हेही पाहा :


 

Manini