Prepare time: 10 min
Cook: 20 min
Ready in: 30 min
Ingredients
- चिकन - 250 ग्रॅम
- दही- अर्धी वाटी
- बार्बेक्यू सॉस - 2 टेस्पून
- मीठ - चवीनुसार
- मिक्स हर्ब्स - 1 टीस्पून
- कोळशाचा लहानसा तुकडा
Directions
- एका भांड्यात दही, बार्बेक्यू सॉस, मिक्स हर्ब्स आणि मीठ चांगले मिसळा. अशाप्रकारे मॅरीनेट साठीचे मिश्रण तयार आहे.
- चिकन धुवून गाळून घ्या आणि नंतर या मॅरीनेटमध्ये घाला व मिक्स करा. 45 मिनिटांकरता हे मॅरीनेट होऊ द्यात.
- नॉनस्टिक पॅनवर थोडे तेल गरम करून चिकन मंद आचेवर शिजवून घ्या.चिकन आतून पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवा.
- याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी गॅसवर कोळसा जाळून त्याला वाटीत ठेवा आणि ही वाटी चिकन शिजत असलेल्या पॅनमध्ये ठेवून पॅन 5 मिनिटांकरता झाकून ठेवा.
- अशाप्रकारे तुमचे स्मोकी चिकन तयार आहे. कांद्याच्या रिंग आणि लिंबू बरोबर सर्व्ह करा.