Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- सोयाबीन - 2 वाटी
- चिरलेला कांदा - 1
- आले लसूण पेस्ट - अर्धा चमचा
- हळद - अर्धा चमचा
- तिखट - अर्धा चमचा
- भाजलेले बडीशेप आणि जिरे - अर्धा चमचा
- धणे पाव़डर - अर्धा चमचा
- बेसन - अर्धी वाटी
- कॉर्न फ्लोअर - 1 टेबलस्पून
- तेल - आवश्यकतेनुसार
- मीठ - चवीनुसार
Directions
- सर्वात आधी सोयाबीन उकडून घ्या व ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- आता यात सर्व मसाले टाका आणि बेसन व कॉर्न फ्लोअर टाकून त्याचे पीठ मळून घ्या.
- याचे लहान गोल कबाब तयार करून तव्यावर भाजून घ्या.
- आता कांदा आणि टोमॅटो यांची पेस्ट करून घ्या, एका कढईत तेल टाकून त्यात टोमॅटो, कांदा यांची पेस्ट टाका.
- तेल सुटू लागलं की ढवळणं थांबवा आणि मीठ, हळद, तिखट टाकून 5 मिनिटांकरता एक उकळी येऊ द्यात.
- जेव्हा कढी घट्ट होऊ लागेल तेव्हा त्यात तयार कबाब टाकून गॅस बंद करा. अशाप्रकारे सोया कबाब कढी तयार आहेत.