Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- 1 वाटी साेयाबीन
- 2 वाटी उकडलेले तांदूळ
- 1 गाजर
- 1 कांदा
- 1 लहान शिमला मिरची
- गरजेनुसार कांदा (चिरलेला)
- लसूण बारीक चिरलेला
- 1 ते 2 आले बारीक बारीक चिरलेले.
- हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- गरजेनुसार हिरवी कोथिंबीर
- पांढरी मिरी पावडर
- 2 चमचे सोया सॉस
- 1 ते 2 चमचे लाल मिरची साॅस
- 1 चमचा व्हिनेगर
- चवीनुसार मीठ
- 3 चमचे स्वयंपाकाचे तेल
- 1 ते 2 चमचे हळद
Directions
- फ्राइड राइस तांदूळसाठी प्रथम तांदूळ एका पॅनमध्ये 90% पर्यंत उकळवा
- आणि नंतर ते चाळणीवर ठेवा जेणेकरून तांदूळ मऊ राहतील.
- आता तांदूळ थंड होऊ द्या आणि इतर तयारी करू घ्या.
- सोयाबीन उकळण्यासाठी, एका पॅनमध्ये पाणी गरम करा आणि त्यात मीठ घाला
- पाणी उकळल्यावर त्यात सोयाबीन आणि हळद घाला.
- हळद घातल्याने सोयाबीनचा रंग चांगला राहील आणि मीठ घातल्याने सोयाबीन बेचव लागणार नाही. 2 ते 3 मिनिटांनी सोयाबीन चांगलं उकळेल.
- आता सोयाबीन काढून चाळणीमध्ये पाणी गाळून घ्या.
- सर्व भाज्या कापून घ्या. आता एका पॅनमध्ये 2 चमचे कुकिंग ऑइल घालून गरम करून घ्या. आता उकळून घेतलेले सोयाबीन शैलो फ्राय करून घ्या. आता 1 चमचा गरम तेलात आले आणि लसूण २० सेकंद परतून घ्या आणि
- नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदा घाला.कांदा थोडासा गुलाबी झाल्यावर त्यात गाजर, स्प्रिंग ओनियन्स आणि शिमला मिरची घाला.आता सर्व भाज्या 2 ते 3 मिनिटे शिजवा जेणेकरून भाज्या थोड्या मऊ होतील
- आता त्यात सोया सॉस, लाल मिरची सॉस आणि व्हिनेगर घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा.
- आता सोयाबीन घाला. 2 मिनिटांनी भात घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. सोयाबीनमध्ये मीठ घाला.
- आता वरून कोथिंबीरआणि कांदा स्प्रिंग करा. गरमागरम सोयाबीन राइस तयार आहे.