Sunday, February 9, 2025
HomeमानिनीRecipeMexican Samosa : मेक्सिकन समोसा

Mexican Samosa : मेक्सिकन समोसा

Subscribe

आपल्या प्रत्येकाला सामोसा खूप आवडतो. परंतु तुम्हाला काही हटके स्वादिष्ट असं काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही मेक्सिकन समोसा निश्चितपणे ट्राय करू शकता. आज आपण जाणून घेऊयात मेक्सिकन समोसा कसा बनवायचा.

Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min

Ingredients

  • समोसा कव्हर करायला

  • 1 वाटी मैदा
  • 2 चमचे तेल
  • मीठ चवीप्रमाणे
  • पाणी

  • स्टफिंगसाठी

  • 1 वाटी उकडलेले कॉर्न
  • 1 वाटी उकडलेला राजमा
  • 2 शिमला मिरची बारीक कापलेल्या
  • 2 कांदे बारीक चिरलेला
  • 2 टोमॅटो बारीक चिरलेला
  • 1 चमचा आलं लसूण पेस्ट
  • 1 चमचा लाल तिखट
  • 1 चमचा गरम मसाला
  • 1 चमचा मिरपूड
  • 1 चमचा लिंबाचा रस
  • 1 वाटी चीज किसलेले
  • मीठ चवीनुसार
  • 1 चमचा तेल

Directions

  1. एका परातीमध्ये मैदा, मीठ आणि तेल घालून चांगले मिक्स करून घ्या.
  2. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या.
  3. पीठ मळून घेतल्यावर 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवा.
  4. आता एका बाजूला पॅन तापत ठेवा.
  5. तेल गरम करून घ्या.
  6. त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट घालून चांगलं परतून घ्या.
  7. कांदा गुलाबी आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा.
  8. त्यानंतर यामध्ये कॉर्न, राजमा, शिमला मिरची आणि सर्व मसाले घालून ५-७ मिनिटे परतून घ्या.
  9. शेवटी लिंबाचा रस आणि चीज घालून गॅस बंद करा. मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या.
  10. आता पीठ लाटून त्याचे लहान लहान गोळे बनवा.प्रत्येक गोळ्याची पातळ पूरी लाटून मधून अर्धी कापा.अर्धगोल तुकड्याला कोनाचा आकार द्या. तयार केले मिश्रण या अर्धगोल आकारात भरा. समोसा बंद करून कडांना पाणी लावून दाबा.
  11. गरम तेलात समोसे सोनेरी रंग येईपर्यंत तळा. गरमागरम मेक्सिकन समोसा तयार आहे.
  12. या समोसाचा आस्वाद तुम्ही हिरव्या चटणी किंवा सॉस सोबत घेऊ शकता.

Manini