Tuesday, January 21, 2025
HomeमानिनीFashionFashion Tips : स्टायलिश आणि परफेक्ट लूकसाठी स्ट्रेटफिट जीन्स

Fashion Tips : स्टायलिश आणि परफेक्ट लूकसाठी स्ट्रेटफिट जीन्स

Subscribe

स्टाइल आणि कम्फर्टच्या बाबतीत जीन्स सर्वात उत्तम आहे. आपल्याला कुठेही बाहेर फिरायला जायचं असेल तरी आपण जीन्सची निवड करतो. ऑफिस, कॉलेज किंवा दैनंदिन वापरासाठी आपण जास्त करून जीन्स घेण्याचा विचार करताे. पूर्वीच्या काळी जीन्सचे खूप मर्यादित पर्याय होते. परंतु आता तुम्हाला जीन्सचे असंख्य प्रकार पाहायला मिळतील. स्ट्रेटफिट जीन्स, बॉटम जीन्स, मॉम फिट, किंवा स्किनी जीन्स. आपण प्रसंगानुसार या जीन्सची निवड करतो. या जीन्स तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन दोन्ही ठिकाणी सहजपणे मिळेल.

जर तुम्हाला स्टयलिश आणि परफेक्ट लूक करायचा असेल तर तुम्ही स्ट्रेटफिट जीन्सची निवड करू शकता. या जीन्स खूप आरामदायी आणि स्टायलिश देखील दिसतात.

कॅज्युअल लूक

कॅज्युअल लूकसाठी तुम्ही स्ट्रेटफिट जीन्सची निवड करू शकता. या जीन्स कॅज्युअल लूकसाठी परफेक्ट आहेत. यावर तुम्ही बेसिक व्हाईट टी-शर्ट किंवा ब्लॅक शर्ट स्टाइल करू शकता.

रंग आणि फॅब्रिक

कोणतीही जीन्स निवडताना त्या जीन्सच रंग आणि फॅब्रिक बघणे देखील गरजेचं आहे. बऱ्याचदा जीन्स चांगली दिसते परंतु त्याच फॅब्रिक चांगलं नसल्यामुळे ती लगेच खराब होते. स्ट्रेटफिट जीन्समध्ये लाईट ब्लू, ब्लॅक किंवा व्हाईट टोन लूकसाठी सर्वोत्तम आहे.

योग्य फिटिंग निवडा

योग्य फिटिंग असलेल्या जीन्सची निवड करा. जीन्स आपल्या कमर ते पायांपर्यत नीट बसते का ते आधी तपासून घ्या. फार घट्ट किंवा सैल जीन्सची निवड करू नका.

टॉपचे कॉम्बिनेशन

स्ट्रेटफिट जीन्ससोबत तुम्ही क्रॉप टॉप किंवा साधा किंवा प्रिंटेड टी-शर्ट टक करून घातल्यास कॅज्युअल लूक चांगला दिसेल . हिवाळ्यात तुम्ही जॅकेट किंवा ब्लेझर घालून लूक स्टयलिश बनवू शकता.

हेही वाचा :  Fashion Tips : मजुरांची जीन्स कशी बनली फॅशन स्टेटमेंट?


Edited By : Prachi Manjrekar

Manini