Prepare time: 20 min
Cook: 20 - 22 mins
Ready in: 40- 45 mins
Ingredients
- पापलेट - 2 ते 3
- ओले खोबरे - 1 वाटी
- मिरची
- कांदा
- जिरे
- तांदळाचे पीठ
- साखर
- चिंचेचा कोळ
- कोथिंबीर
- तेल
- हळद
- मीठ
Directions
- सर्वात आधी पापलेटचे पंख आणि शेपूट काढून टाकावी.
- पापलेट आडवा धरुन हलक्या हाताने मधोमध कापून घ्यावा, जेणेकरुन त्यातील काटा वेगळा होईल किंवा तुम्ही पापलेटला दोन्ही बाजूंनी चिरा पाडून घेऊ शकता.
- याहून सर्वात सोपा मार्ग म्हणजे कोळीणीकडून कापून घेऊ शकता.
- आता पापलेटला चिंचेचा कोळ, मीठ , हळद, लाल तिखट लावून मॅरिग्नेट करण्यास ठेवा.
- ओलं खोबरं, मिरची, कोथिंबीर, जिरे, कांदा एकत्र करुन वाटण तयार करुन घ्यावे.
- तयार वाटण पापलेटमध्ये भरावे आणि 5 मिनिटांसाठी ठेवा.
- आता पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाले की, तांदळाच्या पीठात पापलेट घोळवून तेलात तळून घ्यावे.
- गरमागरम भरलेलं पापलेट भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा.