साडीमध्ये प्रत्येक स्त्री ही खूप सुंदर दिसते. साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक प्रयत्न करत असतात. साडी सुंदर असली पण ब्लाउज खास नसेल तरी संपूर्ण साडीचा लूक खराब होतो. आजकाल साडीप्रमाणे ब्लाउजचे देखील तुम्हाला असंख्य प्रकार मिळतील. तुम्ही ऑनलाइन काही ब्लाउजचे डिझाइन्स बघून टेलरकडून त्या डिझाइन्स बनवून घेऊ शकता. किंवा अभिनेत्रींच्या आयडियाज घेऊ शकता. आज आपण जाणून घेऊयात, साडीवर कसं ब्लाउज स्टाइल करायचं.
साध्या साडीवर फॅन्सी ब्लाउज
तुम्ही साध्या साडीवर फॅन्सी ब्लाउज शिवून घेऊ शकता. मिरर वर्क किंवा सीक्विन्स , हलक्या रंगाच्या साडीवर मिरर वर्क किंवा चमकदार ब्लाउज वापरू शकता.
भारी साडीवर साधा ब्लाउज
जर साडी खूप डिझाइनर असेल तर सध्या आणि नेटक्या फिटचा ब्लाउज तुम्ही घालू शकता. हाई नेक किंवा कॉलर ब्लाउज साडीला भारी साडीला रॉयल टच देतील. हे लूक तुम्ही पार्टीला किंवा कोणत्याही फंक्शनला ट्राय करू शकता.
डिझायनर ब्लाउज
बॅकलेस किंवा डीप बॅक ब्लाउज पार्टी किंवा रिसेप्शनसाठी परफेक्ट आहे. कोल्ड शोल्डर किंवा ऑफ-शोल्डर मॉडर्न लुकसाठी उत्तम आहे.
फ्यूजन लूक
![](https://www.mymahanagar.com/wp-content/uploads/2024/12/prachii-10-1024x666.jpg)
हल्लीच्या तरुण मुली या फ्यूजन लूक करतात. प्लेन किंवा प्रिंटेड क्रॉप टॉपचा वापर ब्लाउज म्हणून करतात. त्या साडीवर क्रॉप टॉप किंवा प्लेन किंवा प्रिंटेड क्रॉप टॉप स्टाइल करतात. थंडीत साडीसह उबदार आणि ट्रेंडी लूक खूप सुंदर दिसेल.
फॅब्रिकची योग्य निवड
कॉटन साडीसह सिल्क, वेल्वेट किंवा ब्रोकेड ब्लाउज चांगला दिसेल .सिल्क किंवा झरी नेट, शिफॉन किंवा जॉर्जेट ब्लाउज खूप सुंदर दिसेल.
स्टायलिंग टिप्स
- साडीवर ब्लाउज स्टाइल करताना साडीचा रंग डिझाइन्स लक्षात घ्या.
- तुमच्या शरीराला शोभेल असा ब्लाउजची निवड करा.
- फिटिंग योग्य ठेवा.
हेही वाचा : Fashion Tips : टर्टलनेक ब्लाउजचा नवा ट्रेंड
Edited By : Prachi Manjrekar