आजकालच्या युगात स्टाइला खूप प्राधान्य दिले जाते. या स्टाइल आणि फॅशनमुळे आपण आपलं स्वतःच एक व्यक्तिमत्त्व तयार करतो. आपल्या आऊटफिट प्रमाणे ज्वेलरी देखील महत्वाचा भाग आहे. या आऊटफिट आणि ज्वेलरीमुळे तुमचा लूक परिपूर्ण आणि सुंदर दिसेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विविध फॅशनट्रेंड्स जाणून घेतात येतात आणि स्टाइल अपग्रेड करण्यासाठी आपण हे ट्रेंड फॉलो करतो. आज आपण स्टाईल अपग्रेड करणारे काही आऊटफिट आणि ज्वेलरी बदल जाणून घेऊयात.
आऊटफिटसाठी टिप्स
ब्लेझर
तुम्ही हे दोन्ही पद्धतीचे ब्लेझर ट्राय करू शकता. हे कोणत्याही आऊटफिटवर प्रीमियम लूक देते . मोनोटोन ड्रेस हा खूप सुंदर आणि एलिगंट दिसतो. त्यामुळे स्टयलिश दिसण्यासाठी तुम्ही हे ब्लेझर ट्राय करू शकता.
मॉडर्न एथनिक
मॉडर्न आणि एथनिक लूकसाठी तुम्ही इंडो-वेस्टर्न आऊटफिट ट्राय करू शकता. आउटफिट्स जसे, प्लाझो, क्रॉप टॉप, अंगरखा स्टाईल कुर्ती इत्यादी.
पेस्टल शेड्स
आजकाल पेस्टल शेड्स खूप ट्रेंडमध्ये आहे आणि ते खूप स्टयलिश दिसतात. तुम्हाला पेस्टलमध्ये देखील असंख्य प्रकार आणि पॅर्टन्स मिळतील.
योग्य फॅब्रिकचा विचार करा
तुम्ही सिल्क लिनन, आणि साटन असलेल्या फॅब्रिक्सची निवड करू शकता. हा लूक खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल. तुम्ही काही सॉलिड रंग देखील वापरू शकता.
हाय-वेस्ट किंवा स्ट्रेटफिट
तुम्ही हाय-वेस्ट किंवा स्ट्रेटफिट जीन्सवर पफ-स्लीव्ह टॉप किंवा डेनिम डेनिम जॅकेट इत्यादी स्टाइल करू शकता.
ज्वेलरीसाठी टिप्स
मिनिमल लूक
जर तुम्ही मिनिमल लूक कॅरी करत असाल तर स्लीक गोल्ड किंवा सिल्व्हर नेकलेस किंवा इअरिगस घालू शकता.
पेंडेंट नेकलेस
पेंडेंट पासून बनलेले काही ट्रेंडी ज्वेलरी घालू शकता.
लेअरिंग
लेयर्ड नेकलेस किंवा ब्रेसलेट्सचा ट्रेंड सध्या खूप चर्चेत आहे. तुम्ही पांढऱ्या मोत्यांसह लेयरिंग चेन ट्राय करू शकता.
तसेच काही ऑक्सिडाइड ज्वेलरी देखील खूप सुंदर आणि परिपूर्ण दिसेल.
हेही वाचा : Winter Health Tips : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी हे उपाय करा
Edited By : Prachi Manjrekar
.