Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीFashionFashion Tips : या हैक्सच्या मदतीने इंडियन आऊटफिटवर ज्वेलरी स्टाइल करा

Fashion Tips : या हैक्सच्या मदतीने इंडियन आऊटफिटवर ज्वेलरी स्टाइल करा

Subscribe

प्रत्येकाच्या कुटूंबात एक तरी लग्न निश्चितच असेल. सगळीकडे लग्नसोहळ्याची जोरदार तयारी आपल्याला पाहायला मिळते. भारतीय विवाहसोहळ्यात दागिन्यांची खूप महत्वाची भूमिका असते. दागिन्यांशिवाय आपला संपूर्ण लूक हा अपूर्ण आहे. कोणत्याही खास प्रसंगी किंवा फंक्शनला आपण नेहमी पारंपरिक कपडे परिधान करतो. या पारंपरिक कपड्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या ज्वेलरी शोभून दिसतात. पण जेव्हा आपण एथनिक लूक करतो तेव्हा ज्वेलरी स्टाइल करताना अनेक चुका होतात. त्यामुळे आपला संपूर्ण लूक देखील खराब होतो. बऱ्याचदा आपल्या कळत नाही, कोणत्या इंडियन आऊटफिटवर कोणत्या ज्वेलरी आपण स्टाइल करू शकतो. आज आपण काही हैक्स बद्दल जाणून घेऊयात.

आऊटफिटवर ज्वेलरी स्टाइल करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • कॅज्युअल आउटफिटसाठी लहान आणि साध्या डिझाइनची ज्वेलरी चांगली दिसेल.
  • पार्टीवेअर किंवा ट्रेडिशनल आऊटफिटसाठी स्टेटमेंट आणि डिझायनर ज्वेलरी ट्राय करू शकता.
  • ज्वेलरीचा प्रकार लक्षात घेऊन स्टाइल करा.
  • मिनिमलिस्टिक ज्वेलरी, डायमंड किंवा मेटॅलिक हे वेस्टर्न वेअरसोबत ट्राय करू शकता.
  • एकाच प्रकारची ज्वेलरी स्टाइल केल्याने तुम्हाला एक परफेक्ट लूक मिळेल.

या हैक्सच्या मदतीने इंडियन आऊटफिटवर ज्वेलरी स्टाइल करा

मेटल ज्वेलरी

इंडियन आऊटफिटसह दागिने स्टाइल करताना तुम्ही मेटल ज्वेलरीमध्ये काही एक्सपेरीमेंट करू शकता. मेटल ज्वेलरी खूप आकर्षक आणि सुंदर दिसतात. त्यामुळे तुम्हाला एक हटके आणि सुंदर लूक मिळेल.

- Advertisement -

रिंग्ज 

बऱ्याचदा आपण दागिने स्टाइल करताना नेकपीस किंवा कानातल्यांवर लक्ष देतो. परंतु तुम्ही अंगठीच्या मदतीने तुमचा लूक सहजपणे बदलू शकता. ॲक्सेसरीज, डायमंड किंवा रोझ गोल्ड अशा सुंदर अंगठ्या तुम्हाला सहजपणे ऑनलाइन किंवा बाजारात मिळेल.

नोज रिंग

नोज रिंगमुळे तुमचा संपूर्ण लूक बदलतो. काही हटके आणि स्टयलिश लूकसाठी तुम्ही या नोज रिंगचा वापर करू शकता.

- Advertisement -

इअररिंग्स आणि नेकलेस स्टाइलिंग हैक्स

  • ज्वेलरीमध्ये कानातले आणि नेकलेसला जास्त प्राधान्य दिले जाते. इअररिंग्स आणि नेकलेसमुळे लूक खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो.
  • जर तुमचा ड्रेस हैवी असेल तर कमी जड नेकलेस आणि इअररिंग्स घाला.
  • यामुळे तुमचा लूक समान दिसेल.
  • तुम्ही सिंम्पल लूक करत असाल तर त्यावर हैवी ज्वेलरी आणि इअररिंग्स घालू शकता.
  • इंडियन आऊटफिटवर तुम्ही लेयर्ड नेकलेस ट्राय करू शकता.

हेही वाचा : Bridal Fashion : लग्नाच्या ज्वेलरीसाठी हे आहेत लेटेस्ट ट्रेंड्स


Edited By : Prachi Manjrekar

 

- Advertisment -

Manini