Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीRecipeSugar free Kaju Katli : होममेड शुगर फ्री काजू कतली

Sugar free Kaju Katli : होममेड शुगर फ्री काजू कतली

Subscribe

काजू कतली मिठाईच्या प्रकारातील अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. अनेकजणांच्या आवडीची काजू कतली असते. पण, शुगर असणाऱ्या व्यक्तींना दिवाळीच्या दिवसात मिठाईचा आस्वाद घेता येत नाही. यावरच उपाय म्हणून आज आम्ही शुगर फ्री काजू कतलीची रेसिपी घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला शुगरची चिंता राहणार नाही.

Prepare time: 20 min
Cook: 25 - 30 min
Ready in: 45 min

Ingredients

  • काजू - 2 कप
  • गुळ - अर्धा कप
  • पाणी
  • चांदीचा वर्क - आवश्यकतेनुसार

Directions

  1. शुगर फ्री काजू कतली बनवण्यासाठी काजूची बारीक पावडर तयार करून घ्या.
  2. यानंतर काजूची पावडर गाळणीतून गाळून घ्या.
  3. गुळाचे लहान लहान तुकडे करून घ्या.
  4. एका भांड्यात पाणी टाकून त्यात गुळाचे तुकडे टाका आणि पाण्यात पूर्णपणे वितळवून घ्या.
  5. एकप्रकारे गुळाचा पाक एकतारी पाक तयार करून घ्या.
  6. पाकात आता काजूची पावडर एकजीव करून घ्या.
  7. थंड झाल्यावर त्याचा एक डो तयार करून घ्या.
  8. तयार पीठाच्या गोळ्याला 2 बटर पेपरच्या ठेवून पोळीसारखे लाटून घ्या.
  9. यानंतर काजू कतली डायमंड शेप मध्ये कापून घ्या.
  10. तुमची होममेड शुगर फ्री काजू कतली तयार झाली आहे.

Manini