गोड पदार्थ कोणाला आवडत नाहीत? मिठाई खाल्ल्याने सर्वांनाच आनंद होतो, पण तुम्हाला माहित आहे का की साखरेचे सेवन केल्याने तुमच्या मानसिक स्थितीवर देखील परिणाम होत असतो. यामुळे नैराश्य निर्माण होते.
खरं तर, जेव्हा आपण सतत साखरयुक्त स्नॅक्स किंवा पेये घेतो तेव्हा यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि कमी होते, ज्यामुळे हार्मोन्सची पातळी सतत बदलत राहते. यामुळे लालसा, मूड बदलणे आणि ऊर्जा कमी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त साखर शरीराची संपूर्ण सिस्टीमही खराब करू शकते. यासाठीच जाणून घेऊयात साखरेच्या सेवनाने खरंच नैराश्य निर्माण होते का याबद्दल.
साखरेचे सेवन केल्याने चिंता निर्माण होते का?
खरं तर, जेव्हा तुम्ही साखरयुक्त पदार्थ खाता तेव्हा तुमच्या रक्तातील साखर झपाट्याने वाढते. आपले शरीर नंतर वाढलेली ग्लुकोज शोषून घेण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी पुन्हा नियमित करण्यासाठी अधिक इन्सुलिन तयार करते.
त्यामुळेच या प्रक्रियेत शरीराला खूप मेहनत करावी लागते, ज्यामुळे रक्तदाबात चढउतार निर्माण होऊ लागतात आणि हे चढउतार आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम करू लागतात.
जेव्हा साखरेची पातळी कमी होते तेव्हा आपली चिडचिड आणि चिंता वाढते. यामुळे चिंतेची लक्षणे आणखी वाढू शकतात रक्तातील साखरेमध्ये अचानक बदल झाल्यामुळे तुमच्या शरीरात हार्मोनल असंतुलन होते ज्यामुळे मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो.
जर तुम्ही चॉकलेट, केचअप, सोडा इत्यादी प्रक्रिया केलेली साखर खात असाल तर ते आणखी चिंता वाढवते. यामुळे तुम्हाला आणखी चिडचिड आणि उदास वाटू शकते . जर तुम्हाला चिंता आणि तणाव कमी करायचा असेल तर तुम्ही साखरेच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे.
जर आपण आधीपासूनच आपल्या साखर खाण्यावर नियंत्रण ठेवले तर जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार होणार नाही. आणि त्यामुळे मानसिक आरोग्यही अबाधित राहिल. व नैराश्य, चिंता यासारख्या समस्याही भेडसावणार नाहीत.
हेही वाचा : Health Tips : फोनच्या अतिवापरामुळे कमी होऊ शकते पचनशक्ती
Edited By – Tanvi Gundaye