थंडीला सुरवात झाली असून या दिवसात आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो. आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये सुद्धा अनेक बदल होत असतात. शरीराला उष्णता मिळावी म्हणून आहारात आणि आपल्या पोशाखात अनेक बदल करतो. आरोग्याची आणि त्वचेची देखील योग्यरीत्या काळजी घेतो. परंतु या थंडीच्या दिवसात स्वेटर घालून स्टाइलिश दिसणं सोपं असतं परंतु जर तुम्ही योग्य प्रकारे स्टाइल करत असाल तर तुमचा हा लूक खूप हटके आणि सुंदर वाटेल. बऱ्याचदा आपल्या स्वेटर स्टाइल कसं करायचं हे माहित नसतं त्यामुळे आज आपण काही स्टाइलिंग टिप्स जाणून घेऊयात.
एक्सेसरीजसह स्टाइल करा
आपल्या स्वेटरला एक्सेसरीजसह स्टाइल करा. नेकलेस, कानातले, इत्यादी एक्सेसरीजचा वापर करा.
बेल्टसह लूक करा ट्राय
हिवाळ्यात स्टयलिश दिसायचं असेल तर स्वेटर, स्कीनी जीन्स किंवा जेगिंग्ज , पेन्सिल स्कर्ट इत्यादींचा तुम्ही विचार करू शकता. जर तुम्ही तुम्ही फिटेड स्वेटर घालत असाल तर पँट किंवा सैल कार्गोसह घालू शकता.
कैज्वल लूकला करा स्टाइल
कैज्वल लूकमध्ये सुद्धा तुम्ही स्टयलिश दिसू शकता. जीन्ससह शॉर्ट कार्डिगन ब्लेज़र उत्तम आहे. हे तुम्ही वर्कप्लेस ते नॉर्मल डे आऊटला देखील कैरी करू शकता.
डेट नाइटसाठी
तुम्ही डेट नाइटसाठी देखील स्वेटर स्टाइल करू शकता. काही एक्सपेरिमेंट करू शकता. मिनी स्कर्टसह टर्टल वी नेक स्वेटर अस काही ट्राय करू शकता.
लेयरिंग पर्याय आहे बेस्ट
जास्त थंडी असेल तर स्वेटरसह श्रग, ट्रेंच कोट लॉन्ग जैकेट इत्यादी ट्राय करू शकता. तुम्ही पार्टीला जात असाल तर ड्रेससोबत कार्डिगन किंवा ओव्हरसाईज वुलन श्रगचे कॉम्बिनेशन उत्तम दिसेल.
हेही वाचा : Shawl Draping Tricks : हिवाळ्यातील लग्नसराईसाठी शाल ड्रेपिंग आऊटफिट आहे बेस्ट
Edited By : Prachi Manjrekar