तमन्ना भाटिया ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे. तिने हिंदी, तेलुगु, तमिळ आणि कन्नड या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तमन्ना भाटियाने आपली करिअरची सुरवात २००५ साली हिंदी चित्रपट ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर तिने तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली.’बाहुबली’ या चित्रपटामुळे तमन्ना भाटियाला जास्त प्रसिद्धी मिळाली.
तिच्या अभिनयासह लोक तिच्या फॅशला देखील मोठ्या प्रमाणात फॉलो करतात इंस्टग्रामवर देखील तिचे खूप फॉलोवर्स असून तिचा खूप मोठा चाहता वर्ग देखील आहे. तमन्ना भाटिया तिच्या अभिनय, फॅशन, लूक्समुळे ती नेहमीच चर्चेत असते. आज आपण तमन्ना भाटियाचे काही 2024 चे अट्रॅक्टीव्ह लूक जाणून घेऊयात.
मिलान फॅशन वीक 2024
तमन्ना भाटिया यांनी मिलान फॅशन वीकमध्ये रॉबर्टो कॅवालीने डिझाइन केलेल ऑउटफिट घातलेल होत. या ऑउटफिटमुळे ती खूप चर्चेत होती. तिचा हा लूक आकर्षक दिसत होता.
आर्ट मुंबई 2024 रेड कार्पेट लूक
रेड कार्पेटमध्ये प्रत्येक अभिनेत्रीचा लूक हा हटके आणि स्टयलिश असतो. यामध्ये तमन्ना भाटिया खूप सुंदर दिसत होती. तिने हिरव्या रंगाचा लॉन्ग ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती
बॉक’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये
तमन्ना भाटिया यांनी ‘बॉक’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये जयंती रेड्डी यांनी डिझाइन केलेली निळी साडी नेसली होती.त्यांचा लूक अधिक आकर्षक दिसत होता.
स्त्री चित्रपटातील आयटम साॅंग
स्त्री हा चित्रपट खूप चर्चेत होता. या चित्रपटातील आज की रात या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली. या गाण्यामधला तमन्ना भाटियाचा लूक देखील खूप आकर्षक आणि सुंदर वाटत होता.
हेही वाचा : Fashion Tips : ख्रिसमस पार्टीला हे पोल्का ड्रेस करा ट्राय
Edited By : Prachi Manjrekar