Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- ब्रोकोली - 500 ग्रॅम
- घट्ट दही - 1 वाटी
- लाल तिखट - 2 टीस्पून
- हळद - 1 टीस्पून
- काळी मिरी पूड - 1/2 टीस्पून
- आले लसूण पेस्ट - 1 टीस्पून
- तेल - 2 टीस्पून
- मीठ - चवीनुसार
- काश्मिरी लाल मिरची पावडर - 1 टीस्पून
Directions
- ब्रोकोलीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या व त्याचे देठ काढा. आता गॅसवर पाणी गरम करत ठेवा त्यात 1 चमचा मीठ टाका आणि आता ब्रोकोलीचे तुकडे टाकून त्यांना अर्धवट (हाफ बॉइल) उकळून घ्या
- आता गाळणीच्या साहाय्याने यातील अतिरिक्त पाणी काढून टाका. एका बाउलमध्ये दही काढून घ्या. त्याला चांगले फेटा आणि त्यात सर्व मसाले व मीठ टाकून छान एकजीव करून घ्या.
- आता ब्रोकोलीचे तुकडे या दह्यामध्ये चांगले घोळवून घ्या. दही आणि मसाल्याचे व्यवस्थित कोटिंग करून मेरिनेट करून घ्या. आता याला फ्रिजमध्ये 30 मिनिटांकरता ठेवा.
- 30 मिनिटांनंतर तंदूरीसाठी वापरल्या जाणाऱ्या रॉडला तेलाने ग्रीस करून घ्या. त्यात एकेक ब्रोकोलीचे तुकडे घालून 5 ते 7 मिनिटांकरता सर्व बाजूंनी नीट भाजून घ्या.
- आता तुम्ही याला सर्व्हिंग प्लेटमध्ये काढू शकता आणि हिरव्या पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता.