Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- रवा - 1 कप
- दही - 1/2 कप
- बारीक चिरलेला कांदा - 1
- बारीक चिरलेला टोमॅटो - 1
- बारीक चिरलेली कोथिंबीर - 2 टेबलस्पून
- हिरव्या मिरच्या - 1-2 (चिरलेल्या)
- आले - 1 टीस्पून (किसलेले)
- जिरे - 1/2 टीस्पून
- हळद - चिमूटभर
- मीठ - चवीनुसार
- पाणी - आवशक्यता प्रमाणे
- तेल
Directions
- एका भांड्यामध्ये रवा आणि दही घालून चांगले मिक्स करून घ्या.
- आवशक्यतेप्रमाणे पाणी घालून मऊसर पिठासारखे मिश्रण तयार करून घ्या.
- 15-20 मिनिटे झाकून ठेवा.
- भिजत घातलेल्या रव्याच्या मिश्रणात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आले, जिरे, हळद आणि मीठ घालून मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या.
- मिश्रण खूप पातळ किंवा घट्ट होऊ देऊ नका.
- ते डोश्याच्या पिठासारखे बनवा.
- हे मिश्रण बनवून झाल्यावर ते बाजूला ठेवा.
- तवा गरम करत ठेवा.
- तव्यावर तेल घालून तवा गरम करून घ्या.
- बाजूला ठेवलेले मिश्रण तव्यावर घालून त्याला गोलसर आकार द्या.
- गॅस मध्यम आचेवर ठेवून डोसा नीट भाजून घ्या.
- एक बाजू हलकी सोनेरी झाली की , दुसऱ्या बाजूने पलटून भाजून घ्या. आता गरमागरम रवा चिला तयार आहे. या रवा चिल्याचा आस्वाद तुम्ही हिरव्या चटणी किंवा सॉस सोबत घेऊ शकता.