Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- 1 कप रवा
- 3 कप पाणी
- 2 चमचे तेल
- 1 टीस्पून मोहरी
- 1 टीस्पून चना डाळ
- 1टीस्पून उडद डाळ
- 1/4 टीस्पून हिंग
- 1 टीस्पून आले (चिरून)
- 1 हिरवी मिरची (चिरलेली)
- चवीनुसार मीठ
- 1कांदा बारीक चिरलेला
- 1 ते 2 कप गाजर बारीक चिरलेले
- 1/4 कप वाटाणे
- 1/2 लिंबाचा रस
- 1 टीस्पून तूप
Directions
- सर्वप्रथम एक पॅन घ्या.
- पॅनमध्ये रवा चांगला परतून घ्या.
- रवा चांगला परतून घेतल्यावर गॅस बंद करून बाजूला ठेवा.
- आता दुसरा पॅन घेऊन त्यामध्ये तेल घाला.
- तेल घातल्यावर त्यामध्ये राई हिंग मोहरी आले आणि कढीपत्ता घाला.
- कढीपत्ता घालून झाल्यावर, त्यामध्ये चना डाळ आणि उडीद डाळ घाला.
- डाळी घालून झाल्यावर त्यामध्ये कांदा गाजर, वाटाणे आणि मिरची घाला.
- सर्व घातल्यावर चवीप्रमाणे मीठ घाला.
- चांगलं परतून घ्या.
- परतून झाल्यावर पाणी घाला.
- पाणी घालून झाल्यावर त्यामध्ये थोडा रवा घाला. रवा चांगला मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यावर त्यावर थोडं तूप घाला.
- गरमागरम रवा उपमा तयार आहे.