लोणचे हा आपल्या भारतीयांच्या जेवणातला एक महत्त्वपूर्ण भाग आहे. लोणच्याच्या एका छोट्या तुकड्यामुळे आपल्या जेवणाची लज्जत अशी काही वाढते की तिला तोड नाही. आपल्याकडे अनेक प्रकारची लोणची बनवली जातात, त्यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे आंब्याचे लोणचे. पण हिवाळ्यात लोक मुळा, गाजर, फ्लॉवर इत्यादींचेही लोणचे बनवून खातात.सोप्या भाषेत सांगायचे तर फळांप्रमाणेच भाज्यांपासूनही लोणची बनवली जातात. लोकही ही लोणची अगदी आवडीने खातात.
भाज्यांचे लोणचे खाल्ल्यास काय होते ?
भाज्यांपासून बनवलेले लोणचे खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. लोणच्यामध्ये भरपूर प्रोबायोटिक्स असतात जे अन्नाचे चांगले पचन करण्यास मदत करतात. गॅस आणि ब्लोटिंग सारख्या समस्या यामुळे दूर होतात.
भाज्यांचे लोणचे हा फायबरचा एक चांगला स्रोत आहे. फायबरचे सेवन केल्यास अनेक आजारांचा धोका कमी होतो. जसे लठ्ठपणा, मधुमेह. याशिवाय हे लोणचे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते आणि नियमित मलविसर्जन करण्यासही मदत करते.
हेही वाचा : Split Ends hair : दुतोंडी केसांपासून सुटका मिळवा या उपायांनी
व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भाज्यांच्या लोणच्यामध्ये आढळतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. हे पेशींचे नुकसान टाळते. शरीरातील जळजळ व सूज कमी करते आणि रोगांशी लढण्यास मदत करते.
लोणच्यामध्ये वापरण्यात येणारे मसाल्यांचे पदार्थ जसे की मेथी, बडीशेप सीरम हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात. यामुळे हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते .
भाज्यांपासून बनलेले लोणचे खाल्ल्याने शरीरातील अँटिऑक्सिडंट्स वाढतात कारण या लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास आपल्याला मदत करतात. फ्री रॅडिकल्स हे शरीरातील असे घटक आहेत जे शरीरातील पेशींना नुकसान पोहचवू शकतात, ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात.
हेही वाचा : Health Tips : निरोगी राहण्यासाठी डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश
Edited By – Tanvi Gundaye