Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- 250 ग्रॅम (पावटा, गाजर, फरसबी, हिरवे मटार, वांग, बटाटा)
- 1/2 कप शेंगदाणे
- 1 मोठा कांदा
- 1 इंच आले
- 4-5 लसूण पाकळ्या
- 1/4 कप तीळ
- 1/4 कप सुक खोबर
- 1 टीस्पून धने जीरे पूड
- 1 टेबलस्पून लाल तिखट
- 1/4 टीस्पून हळद
- 1 टीस्पून गरम मसाला
- फोडणीसाठी तेल
- चवीनुसार मीठ
Directions
- प्रथम एका तव्यामध्ये थोडं तेल गरम करून त्यात 1/4 कप कच्चे शेंगदाणे परतून घ्यावेत.
- मग त्यात उभा चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा. त्यातच आले लसूण घालून छान परतून घ्यावं.
- मग त्यात सुकं खोबरं आणि तीळ घालून ते ही परतून घ्यावं. हे मिश्रण थोडं गार झाल्यावर मिक्सर मधून बारीक करून घ्यावं.
- सगळ्या भाज्या धुवून चिरून घ्याव्यात. 1/2 कप शेंगदाणे भिजवून घ्यावेत.
- तव्यावर थोडं तेल घेऊन त्यावर शेंगदाणे आणि सगळ्या भाज्या परतून घ्याव्यात.
- त्यातच मग लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, धने जिरेपूड घालून परतावे. मग तयार केलेले वाटण घालून थोडं पाणी घालून छान वाफवून घ्यावे.
- अशाप्रकारे भोगीची भाजी तयार आहे. वरून तीळ घालून ही भाजी सर्व्ह करावी.