Friday, December 13, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीBeautyPerfect Eye Makeup Tips : परफेक्ट आय मेकअपसाठी फॉलो करा या टिप्स

Perfect Eye Makeup Tips : परफेक्ट आय मेकअपसाठी फॉलो करा या टिप्स

Subscribe

डोळ्यांच्या मेकअपसाठी जर तुम्हाला वेळोवेळी ब्युटी पार्लरला जावं लागत असेल आणि घरीच आय मेकअप करणं ट्रिकी वाटत असेल तर जाणून घेऊयात काही अशा टिप्सबद्दल ज्यांच्या मदतीने परफेक्ट आय मेकअप घरच्या घरीच केला जाऊ शकतो.

डोळ्यांचा मेकअप करणे थोडे कठीण असते. आय मेकअप करण्यासाठी क्रिएटिव्हिटीचा वापर करणंही गरजेचं असतं. जर तुम्ही नेहमी केवळ काजळ आणि आयलायनर लावून तयार होत असाल व तुम्हाला आय मेकअप करणं कठीण वाटत असेल तर तुम्ही या टिप्सची मदत घेऊ शकता. ज्यांच्या मदतीने तुम्हाला घरीच पार्लरसारखा मेकअप लूक मिळेल.

- Advertisement -

डोळ्यांसाठी बेस तयार करा :

सर्वात आधी डोळ्यांच्या आजूबाजूला प्रायमर आणि फाउंडेशन लावून बेस तयार करुन घ्या. ज्यामुळे तिथली त्वचा मुलायम होईल. आणि तुम्ही अगदी आरामात मेकअप अप्लाय करू शकाल. प्रायमर आणि फाऊंडेशनला बोटांच्या साहाय्याने आयलिडस आणि आजूबाजूच्या भागावर लावून घ्या.

Perfect Eye Makeup Tips: Follow these tips for perfect eye makeup

- Advertisement -

बेस कलरचा आयशॅडो लावून घ्या :

सगळ्यात आधी डोळ्यांवर बेस कलर लावून घ्या. तुम्ही याला संपूर्ण आयलिडस वर लावू शकता. लहान ब्रशने हलक्या रंगाचा बेस तयार करुन घ्या. पहिल्यांदाच मेकअप करत असाल तर लाइट ब्राऊन, न्यूट्रल पिंक किंवा पिंक टोन कलरचा बेस कलर लावावा.

रेखीव आकार द्या :

बेस कलर लावून झाल्यावर डोळ्यांना आयलिडस जवळ एक आकार द्या. या शेपला अधिक रेखीव करण्यासाठी गडद रंगाच्या आय कलरचा वापर करा.

डोळ्यांच्या कोपऱ्यांना हायलाइट करा :

डोळ्यांच्या बाहेरील बाजूला गडद रंगाची आयशॅडो लावल्यानंतर कॉर्नरला हायलाइट करण्यासाठी गोल्डन किंवा सिल्व्हर रंगांचा वापर करा.

आयलायनर लावा :

आता सर्वात शेवटी डोळ्यांच्या वर आवडत्या रंगाचा आयलायनर लावावे. विंग्ड , डबल विंग्ड किंवा सिंपल शेप देऊन तुम्ही आयलायनर लावू शकता.

Perfect Eye Makeup Tips: Follow these tips for perfect eye makeup

वॉटर लाइन भरा :

सोबतच डोळ्यांखालील वॉटर लाईनवर देखील काजळ किंवा लायनरच्या मदतीने शेप द्या. जर डोळे मोठे दाखवायचे असतील तर डोळ्यांच्या खालच्या कडेच्या आतील बाजूला पांढरे काजळ आणि बाहेरील बाजूला ब्राउन आयशॅडो लावा.

मस्करा लावायला विसरू नका :

सर्वात शेवटी डोळ्यांना मस्करा लावायला विसरू नका. सोबतच आयलॅशेज कर्लरच्या मदतीने डोळ्यांच्या पापण्या कर्ल करून घ्या.

हेही वाचा : Drinking Water : उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघे दुखतात?


Edited By – Tanvi Gundaye

 

- Advertisment -

Manini