संकष्टी चतुर्थी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात येते. याला अखुरथ संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. जो कोणी या दिवशी बाप्पाची पूजा करून उपवास करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात असे म्हटले जाते. या दिवशी बाप्पाची पूजा आणि उपवास करण्यासोबतच चंद्रदेवाला अर्घ्यही अर्पण केले जाते. हिंदू धर्मानुसार या दिवशी चंद्र देवाला कोणत्या पद्धतीने अर्घ्य द्यावे हे जाणून घ्या.
अखुरथ संकष्टी चतुर्थी चंद्र अर्घ्य :
हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा केली जाते. गणपती हे हिंदू धर्मातील सर्वात पूज्य देवतांपैकी एक दैवत आहे. श्रीगणेशाला बुद्धीची देवता म्हटले जाते. हिंदू धर्मात अनेक उपवास आहेत जे देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी पाळले जातात, परंतु भगवान गणेशासाठी ठेवलेल्या संकष्टी चतुर्थीच्या व्रताला हिंदू धर्मात मोठी मान्यता आहे.
ही संकष्टी चतुर्थी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात येते. म्हणून याला अखुरथ संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. जो कोणी या दिवशी बाप्पाची पूजा करून उपवास करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. तसेच गणपती बाप्पा त्याच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतो असं म्हटलं जातं. या दिवशी बाप्पाची पूजा आणि उपवास करण्यासोबतच चंद्रदेवाला अर्घ्यही अर्पण केले जाते. असे करणे भक्ताला विशेष फलदायी असते अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात या दिवशी चंद्रदेवांना अर्घ्य देण्याची पद्धत सांगितली आहे. ती पद्धत काय आहे ते जाणून घेऊया.
अखुरथ संकष्टी चतुर्थी कधी आहे ?
हिंदू पंचांगानुसार, अखुरथ संकष्टी चतुर्थी 18 डिसेंबर रोजी सकाळी 10.43 वाजता सुरू होईल. ही तिथी 19 डिसेंबर रोजी सकाळी 10:02 वाजता संपेल. अशाप्रकारे १८ डिसेंबर रोजी अखुरथ संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे.
ब्रह्म मुहूर्त सकाळी 5.19 वाजता सुरू होईल आणि 6.04 पर्यंत चालेल.
विजय मुहूर्त दुपारी 2:01 वाजता सुरू होईल आणि 2:42 पर्यंत चालेल.
संध्याकाळचा गोधूली मुहूर्त 5:25 वाजता सुरू होईल आणि 5:52 पर्यंत चालेल.
अमृत काल सकाळी 6.30 पासून सुरू होईल आणि सकाळी 8.07 पर्यंत चालेल.
चंद्राला जल अर्पण करण्याची पद्धत :
या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्यासाठी चांदीच्या पेल्यात किंवा भांड्यात पाणी घ्यावे.
त्या चांदीच्या ग्लासात किंवा भांड्यात कच्चे गाईचे दूध, अक्षता आणि काही पांढरी फुले टाकावीत.
चंद्राला अर्घ्य अर्पण करताना चंद्र देवाचे स्मरण केले पाहिजे.
चंद्राला अर्घ्य अर्पण करताना पायावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी.
चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यावरच हे व्रत पूर्ण होते.
हेही वाचा : Margashirsha Religious Tips : मार्गशीर्ष महिन्यात दक्षिणावर्ती शंखाची पूजा करण्याचे महत्त्व
Edited By – Tanvi Gundaye