आजकालच्या मुली लग्नात सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. हा दिवस प्रत्येक मुलीसाठी खास असतो. हा दिवस अजून विशेष बनवण्यासाठी मुली वर्षभर आधीच तयारी करतात. मेकअप, आऊटफिट, ज्वेलरी अशा प्रत्येक गोष्टीची तयारी केली जाते. मेकअप आणि आऊटफिटसह वधूचे फुटवेयर देखील खूप महत्वाचे आहे. बऱ्याचदा मुली लग्नात हाय हिल्स घालतात. लग्नाच्या वेळी हाय हिल्स घालून नाचणे किंवा स्टेजवर खूप वेळ उभे राहिल्यामुळे मुलींना
खूप वेदना होतात. अशा परिस्थितीत आजकाल मुली हाय हिल्सच्या ऐवजी स्निकर शूज घालतात.
या स्निकर शूज खूप आरामदायी असतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास या फूटवेयरमुळे होत नाही. आजकाल मुलींना लग्नात स्निकर शूज घालणे जास्त सोयीचे वाटते. तुम्ही तुमच्या लेहंगा किंवा साडीप्रमाणे यांची निवड करू शकता. या स्निकर शूज तुमच्या आऊटफिटला मॅचिंग देखील असतात.
नववधूला लग्नात स्निकर शूज घालायचे असतील तर हे आहेत, काही स्टायलिश टिप्स
रेड स्नीकर्स
लग्नात मोठ्या प्रमाणात लाल रंग परिधान केला जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आऊटफिटला मॅचिंग रेड स्नीकर्स घालू शकता. लाल रंगाचे स्नीकर्स कोणत्याही प्रकारच्या वेडिंग आउटफिटला जुळवून घालता येतात. हे खासकरून मॉडर्न लेहंगा सोबत सुंदर दिसू शकतात.
पर्ल असलेले स्नीकर्स
लग्नासाठी सजवलेले स्नीकर्स – जसे पर्ल, किंवा थोडा ग्लिटर असे शूज ब्राइडल आउटफिटला शाही लुक देतात. तुमच्या लग्नासाठी हे स्नीकर्स उत्तम आहेत.
गोल्ड किंवा सिल्वर स्नीकर्स
गोल्डन किंवा सिल्वर टोनचे स्नीकर्स पारंपरिक पोशाखांसोबतही शोभून दिसतात आणि हे फुटवेयर हाय-फॅशन टच देते.
कस्टमाइज्ड स्नीकर्स
नववधू आपल्याला आवडीप्रमाणे स्नीकर्स कस्टमाईज करू शकते.यामध्ये नाव किंवा वेडिंग डेट, किंवा काही खास मेसेज लिहून शकते. हे कस्टमाइज्ड स्नीकर्स खूप आकर्षक आणि सुंदर दिसतात.
फ्लोरल प्रिंट किंवा कलरफुल स्नीकर्स
फ्लोरल प्रिंट असलेले किंवा हलक्या रंगात स्नीकर्स ट्रेडिशनल लूकला मॉडर्न फील देऊ शकतात.
लग्नात आरामदायी वाटण्यासाठी फॅशनेबल दिसण्यासाठी वरील पर्याय निवडू शकता.
हेही वाचा : Wedding Preparation :ऑफिस सांभाळून लग्नाची अशी करा तयारी
Edited By : Prachi Manjrekar