सगळीकडे न्यू इयर पार्टीची तयारी सुरु झाली आहे. तसाच एक वेगळा उत्साह आणि आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. या ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीला बऱ्याच ठिकाणी खास कार्यक्रमाचं आयोजन केलं जात. या पार्टीसाठी आपण आधीच पूर्व तयारी करतो. बऱ्याचदा आपण आऊटफिटचा विचार करतो. पण तुमचा लूक परफेक्ट बनवण्यासाठी तुम्ही काही स्टयलिश बूट्सची निवड करू शकता.
तुम्ही न्यू इयरला काही स्टयलिश बूट्स देखील घालू शकता. या बूट्समुळे तुमचा लूक खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल. आज आपण जाणून घेऊयात, न्यू इयर पार्टीला कोणते बूट्स आपण ट्राय करू शकतो.
हिल शूज
जर तुम्ही पांढरा ड्रेस किंवा स्कर्ट घालत असाल तर हे स्टयलिश बूट्स खूप सुंदर आणि आकर्षक वाटेल. कोणत्याही पार्टीच्या ऑउटफिटवर हे हिल शूज खूप चांगले दिसतील. या बूट्सची किंमत साधारणपणे १००० आहे. हे बूट्स तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी मिळतील.
मिड-टॉप रेगुलर बूट्स
मॅक्सी किंवा मिडी ड्रेससह तुम्ही हे मिड-टॉप रेगुलर बूट्स घालू शकता. हे बूट्स तुम्ही कोणत्याही आऊटफिटवर घालू शकता. या ड्रेसची किंमत 1,500 ते 2,000 रुपयांपर्यत मिळेल.
एंकल लेंथ बूट्स
जर तुम्हाला काही नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे एंकल लेंथ बूट्स ट्राय करू शकता. हे बूट्स खूप सुंदर आणि आकर्षक दिसतील. तुम्ही हे बूट जीन्स किंवा स्कर्टसह स्टाइल करू शकता आणि तुम्हाला हे बूट 700 ते 1,000 रुपयांना मिळतील.
लेदर शूज
पार्टीसाठी लेदर शूज उत्तम आहे. हे शूज तुम्ही पार्टी किंवा कोणत्याही खास प्रसंगी घालू शकता. हिवाळ्यासाठी हे शूज उत्तम आहेत. हे शूज तुम्हाला ऑनलाइन १५०० ते २००० पर्यत मिळतील.
हेही वाचा : Christmas Party : ख्रिसमस पार्टीला हे लॉन्ग ड्रेसेस करा ट्राय
Edited By : Prachi Manjrekar