Sunday, December 15, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीFashionFashion Tips : सावळ्या रंगावर खुलून दिसतात हे रंग

Fashion Tips : सावळ्या रंगावर खुलून दिसतात हे रंग

Subscribe

कपड्यांची खरेदी करताना आपण त्याची साइझ, डिझाइनसोबत त्याच्या रंगाचाही विचार करतो. कपडे निवडताना आपल्याला छान दिसेल आणि आपले सौंदर्य वाढविणारा रंग आपण निवडतो. पण, तरीही अनेक जणांचा कपडे खरेदी करताना गोंधळ उडतो. आज आम्ही तुम्हाला सावळ्या रंगावर कोणते रंग खुलून दिसतात याविषयी माहिती देत आहोत. आता तर लग्नसराईचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे ही बातमी तुमच्या उपयोगी नक्कीच पडेल. गोऱ्या वर्णावर कोणतेही रंग सहजपणे खुलून दिसतात. पण, सावळा रंगावर कोणत्या रंगाचे कपडे छान दिसतील, हा प्रश्न थोडा कठीण असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावळ्या रंगाचे सौंदर्य वाखाडण्याजोगे आहे, हे लक्षात घ्यायला हवे. सावळ्या रंगावर खुलून दिसतील असे अनेक रंग आहेत, जे तुम्ही उत्तमरित्या स्टाइल करून छान लूक तयार करू शकता.

मातीचा रंग –

सावळ्या रंगावर मातकट रंगाचे कपडे छान दिसतात. त्यामुळे एखाद्या फंक्शनमध्ये जाण्यासाठी तुम्ही या रंगाच्या कपड्यांची निवड करू शकता.

- Advertisement -

ऑलिव्ह ग्रीन –

ऑलिव्ह ग्रीन रंगाचे कपडे सावळ्या रंगावर छान दिसतात. यामुळे तुम्हाला बोल्ड लूक मिळतो.

- Advertisement -

डार्क लाल रंग –

काही जणांचा असा गैरसमज असतो की, डार्क रंगाचे कपडे सावळ्या रंगावर खुलून दिसत नाही. पण, हे पूर्णपणे चुकीचे आहे. सावळ्या रंगावर डार्क रंगाचे कपडे खुलून दिसतात.

पिवळा रंग –

पिवळा रंग सावळ्या रंगाच्या स्किन टोन वर अप्रतिम दिसतो. एखाद्या फंक्शनसाठी पिवळा रंग तुम्हाला रॉयल लूक देतो.

वाइन रंग –

अट्रॅक्टिव्ह लूकसाठी तुम्हाला वाइन रंगाची निवड करावी लागेल. वाइन रंग परफेक्ट ऑप्शन राहिल.

पिच –

पिच रंग हा फ्रेश रंग आहे. त्यामुळे तुमची स्किन टोन जर सावळी असेल तर पिच रंग तुमच्यासाठी उत्तम पर्याय असेल.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini